मंडळ कृषि अधिकारी, नातेपुते यांचा राज्यातील पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम – ३०
QR कोड, डीजीटल माहिती बोर्ड २६ गावात अनावरण…
नातेपुते (बारामती झटका)
मंडळ कृषि अधिकारी नातेपुते अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांचे कृषि माहीती विस्तार कार्य अविरत चालू आहे. यांचा प्रत्यय म्हणून ४३ पीक स्पर्धा विजेते एकट्या मंडळ मधून आहेत. महात्मा जोतीबा फुले यांनी म्हटले आहे, त्याप्रमाणे या देशाचे नंदनवन करावयाचे असेल तर ‘शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या शेती विदया’ तंत्रज्ञान शिकविले व अवगत केले पाहिजे. मंडळ स्तरावरून सर्व गावात खरिप हंगाम पूर्व विविध प्रशिक्षण, शेतीशाळा, आद्यरेखा प्रात्यक्षिक, प्रक्षेत्र भेटी, सभा, मेळावे, घोंगडी बैठक, कॉर्नर सभा, प्रात्यक्षिकेद्वारे शेतकऱ्यांना तंत्र व तंत्रज्ञान प्रचार, प्रसार व प्रसिद्धी केली जात आहे. यामधील वेळ, अंतर वाढले कि तंत्र व तंत्रज्ञान याचा विसर पडतो.
सध्याच्या स्थितीत विचार केला तर कुटुंबात किंवा कुटुंबातील ८०% सदस्याकडे ॲन्ड्राईड मोबाईल आहे व त्याचा वापर ते करतात व त्यामध्ये ते तज्ञ व निश्नांत आहेत. या बलस्थानाचा उपलब्धतेचा विचार करून शेतकरी बांधवांना मुळ शेती तंत्रज्ञान व उत्पादन वाढ व बचत बाबी, पद्धती, पीक विज्ञान, योजना, पुरक उद्योग माहिती ३६५ x २४ x ७ साठी त्यांचेच गावात सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी सेवारत्न श्री. सतिश कुंडलिक कचरे मंडळ कृषि अधिकारी नातेपुते संकलीत, लिखीत, निर्मित अद्यावत माहिती, मार्गदर्शन व सल्लासह ३० QR कोड पुढीलप्रमाणे जीवाणू खताचा वापर, नॅनो युरिया वापर, नॅनो डिएपी वापर, युरियाला पर्याय अमोनिअम सल्फेट वापर, मातीपरिक्षणावर आधारित खत नियोजन, सरळ खत वापर व खर्च बचत, आपत्कालीन पीक व्यवस्थापन, आपत्कालीन पीक नियोजन, कृषि क्षेत्रात प्लॅस्टीकचा वापर, बाजरी, मका, भूईमुग, ऊस बीज प्रक्रिया, पीक अनद्रव्ये कमतरता व उपाय, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, किटकनाशके हाताळणी व फवारणी वेळी घ्यावयाची काळजी, गोगल गाय एकात्मिक नियंत्रण, लंफ्फी रोग ओळख व उपाययोजना, मका लष्करी अळी व्यवस्थापन, हुमणी अळी व्यवस्थापन, शाश्वत उत्पादन तंत्रज्ञान, तण ओळख एकात्मिक नियंत्रण, रेशीम उद्योग योजना, दामिनी ॲप, ऊस खोडवा व्यवस्थापन, खोडवा पाचट व्यवस्थापन, आंबा व पेरू निर्यात, पीएम किसान मानधन मायकोरायझा वापर या विषयावरील 3×2 फुट आकारमानाचे ३० QR कोड बोर्ड मंडळ अधिनस्त २६ गावात खरिप हंगाम प्रशिक्षण व मोहीममध्ये वापर करण्याची कार्यपद्धती प्रशिक्षणासह ग्रामपंचायत कार्यालयात कृषि वार्ताफलकावर लावण्यात आले आहेत.
या QR कोड डिजीटल कृषि माहितीचा शेतकरी बांधवांना पाहिजे तेव्हा फोन पे, गुगल पे, भीम ॲप, किंवा इनबिल्ट फोन QR कोड स्कॅनर आणि OR कोड रिडर ॲपद्वारे सहजरित्या पाहिजे तेव्हा माहिती उपलब्ध होत आहे. याप्रकारे डिजीटल QR कोड द्वारे कृषि विषयक माहिती सल्ला व मार्गदर्शन करणारे नातेपुते मंडळ राज्यातील पहिले मंडळ आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I appreciate the humor in your analysis! For those interested, here’s more: FIND OUT MORE. What do you think?