ताज्या बातम्याराजकारण

मांडवे गावचे सरपंच हनुमंत भीमराव टेळे यांचा सरपंच पदाचा राजीनामा..

मांडवे गावच्या विकास वाटेवरून ग्रामपंचायत सदस्य यांची नव्या वळणावर वाटचाल सुरू झाली.

मांडवे (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी ग्रामपंचायत व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असणारी मांडवे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री. हनुमंत भीमराव टेळे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिलेला आहे. गेल्या महिन्यामध्ये सौ. स्वाती राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड झाली आहे. मांडवे गावच्या विकास वाटेवरून ग्रामपंचायत सदस्य यांची नव्या वळणावर वाटचाल सुरू झालेली आहे. सरपंच पदाची निवडणूक सुद्धा बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

मांडवे ग्रामपंचायतीमध्ये जयवंततात्या पालवे, बबनबापू पालवे, तानाजीआबा पालवे अशा तीन माजी पंचायत समिती सदस्य गटाचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. श्री. हनुमंत भीमराव टेळे, सौ. स्वाती राजेंद्र शिंदे, सौ. शितल अर्जुन दुधाळ, सौ. स्वाती तानाजी दुधाळ, श्री. तात्याबा पांडुरंग शिंदे, श्री. सुरज दिनकर साळुंखे, सौ. बाळाबाई सुनील खुडे, श्री. विठ्ठल ज्ञानेश्वर पालवे, सौ. अश्विनी गजानन पालवे, सौ. हसीना रफिक मुलाणी, श्री. रितेश बबनराव पालवे, सौ. शोभा नाथा सिद, श्री. तानाजी जगन्नाथ पालवे, कु. पंचशीला रामचंद्र गायकवाड, सौ. मनीषा कुमार पाटील, सौ. आनंदीबाई शिवाजी ढोबळे, सौ. मालन बबन खोमणे असे 17 ग्रामपंचायत सदस्य आहेत.

मांडवे ग्रामपंचायतीचे श्री. रघुनाथ रामचंद्र कुलकर्णी 1952 ते 1972, श्री. धर्माजी संभाजी साळुंखे 1972 ते 1977, श्री. बबन गणपत पालवे 1977 ते 1980, श्री. शिवाजी रावजी पाटील 1980 ते 1983, श्री. गजानन गोविंद साळुंखे 1983 ते 1988, श्री. जयवंत मारुती पालवे 1988 ते 2005, सौ. अरुणा भीमराव गायकवाड 2005 ते 2008, श्री. हरिचंद्र बाजी ढोबळे 2009 ते 2010, श्री. तानाजी जगन्नाथ पालवे 2010 ते 2011, श्री. ज्ञानेश्वर दादा पालवे 2012 ते 2014, श्री. राहुल भीमराव दुधाळ 2014 ते 2015, सौ. धनश्री तानाजी पालवे 2015 ते 2018, सौ. मनीषा कुमार पाटील 2018 ते 2020, श्री. हनुमंत भीमराव टेळे 2021 ते 2023 असा सरपंच पदाचा 14 सरपंचांचा कालावधी झालेला आहे. मांडवे गावाला 15 सरपंच कोण मिळतोय ? याकडे गावचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button