मोफत आरोग्य शिबिराचा फायदा घ्या – तहसीलदार समीर माने
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने आरोग्य शिबिर
करमाळा (बारामती झटका)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात मोफत सर्व प्रकारच्या तपासण्या करून मोफत औषधाचे वाटप सुरू आहे. शिवाय डोळ्याची तपासणी करून मोफत चष्म्याचे वाटप सुरू आहे. याचा फायदा सर्वसामान्य जनतेने घ्यावा, असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे. या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.


यावेळी बोलताना पुढे बोलताना ते म्हणाले की, पुढे होणारे मोठे आजार टाळण्यासाठी वेळेवरच शारीरिक तपासण्या होणे गरजेचे आहे. आरोग्याच्या समस्याकडे दुर्लक्ष केले तर भावी काळात मोठे आजार उद्भवू शकतात, यासाठी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहनही तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.
गुरुवार दि. 9 फेब्रुवारी व शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी असे दोन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मोफत चष्मे वाटप व मोफत औषधाचे वाटप सुरू राहणार असून करमाळा शहर व परिसरातील लोकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा असे आवाहन बाळासाहेबांचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.


यावेळी जिल्हाप्रमुख अनिल पाटील, युवा सेना प्रमुख निखिल चांदगुडे, शहरप्रमुख संजय शीलवंत, तालुकाप्रमुख देवानंद बागल, उप शहरप्रमुख नागेश गुरव, युवा सेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, सुधीर आवटे, नागेश शेंडगे, रोहित वायबसे, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, दीपक पाटणे, शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे सह कक्ष प्रमुख शिवकुमार चिवटे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng