ताज्या बातम्याराजकारण

मांडवे जिल्हा परिषद गटात सरपंच रितेश पालवे पाटील निवडणुकीत दंड थोपटणार; कार्यकर्त्यांच्या मागणीने जोर धरला…

मांडवे (बारामती झटका)

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मांडवे गावचे बिनविरोध सरपंच रितेश बबनराव पालवे पाटील यांनी मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीत दंड थोपटावे, अशा कार्यकर्त्यांच्या मागणीने जोर धरलेला आहे.

विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील व जानकर गट एकत्र येऊन सुद्धा मांडवे गावातील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने मांडवे गावातून जास्तीत जास्त मताधिक्य दिलेले आहे. यामध्ये तरुण वर्गाचे योगदान आहे. तरुणांच्या गळ्यामध्ये ताईत असणारे मांडवे गावचे बिनविरोध विद्यमान सरपंच रितेश पालवे पाटील यांनी मांडवे गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे.

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व मांडवे गावचे सरपंच बबनबापू पालवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच रितेश पालवे पाटील यांनी सामाजिक कार्याबरोबर राजकारणाला सुरुवात केलेली आहे. वडिलांचा राजकीय वारसा जपत गावामध्ये युवकांची फळी निर्माण केलेली आहे. सर्व जाती-धर्मातील तरुणांना एकत्र करून गावामध्ये एकोपा निर्माण केलेला आहे. सरपंच पदाच्या कारकिर्दीत गावामध्ये अनेक लोकहिताचे निर्णय घेतलेले आहेत. ज्या मूलभूत सुविधा आवश्यक आहेत, त्याकडे लक्ष देऊन सरपंच कसा असावा, अशी सरपंचाची वेगळी ओळख गावामध्ये निर्माण केलेली आहे. त्यामुळे सर्व जाती धर्मातील तरुणांच्या मनामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत दंड थोपटावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या सहकार्याने व माजी पंचायत समिती सदस्य बबनबापू पालवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा मांडवे जिल्हा परिषद गटात झेंडा फडकवणार, अशी सर्व जाती धर्मातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button