मांडवे येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप

मांडवे (बारामती झटका)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, मांडवे यांच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने मांडवे परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाठकवस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळुंखे वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंडगेवस्ती व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय, मांडवे या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू आणि खाऊ वाटप करून एक आदर्श उपक्रम या जयंती समीतीच्या माध्यमातून राबविण्यात आला.


याप्रसंगी माजी उपसरपंच रामभाऊ गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सुनिल खुडे, पत्रकार दत्ताभाऊ ढोबळे, शिवामृत चे संचालक शरदआबा साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलराव पालवे, सामाजिक कार्यकर्ते बाळु ताटे, जयंती समितीचे अध्यक्ष राजाभाऊ खुडे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब खुडे, धनाजी अवघडे, मारूती शिरूतोडे, प्रकाश खुडे, लाला खुडे, अमोल खुडे, बापु खुडे, मिलिंद खुडे, सुभाष खुडे, प्रकाश खुडे व गावातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे आयोजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, मांडवे यांनी केले होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



