मांडवे येथे महाराष्ट्र चॅम्पियन पै. संग्राम साळुंखे विरुद्ध पै. श्रीमंत भोसले यांच्यात लढत होणार

नवरात्र उत्सवानिमित्त अंबिका देवी तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थ मांडवे यांच्या वतीने भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन
मांडवे (बारामती झटका)
मांडवे ता. माळशिरस, येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी नवरात्र महोत्सवानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन अंबिका देवी तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थ, मांडवे यांच्या वतीने शुक्रवार दि. ११/१०/२०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता अंबिकादेवी मंदिराजवळ, मांडवे टोलनाका येथे करण्यात आले आहे. सदर मैदानाचे उद्घाटन महारुद्र परजणे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक व सर्व गावकरी मंडळी, मांडवे यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
सदर मैदानामध्ये श्री. तानाजी जगन्नाथ पालवे, माजी सरपंच यांच्यावतीने इनाम रुपये ७५ हजार रुपयांसाठी महाराष्ट्र चॅम्पियन पै. संग्राम साळुंखे कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा विरुद्ध पै. श्रीमंत भोसले, इचलकरंजी वस्ताद अमृता भोसले यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. श्री. रितेश बबन पालवे, सरपंच यांच्यावतीने इनाम रुपये ७१ हजार रुपयांसाठी पै. शुभम माने, कण्हेर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल अर्जुनवीर पुरस्कार काका पवार, पुणे यांचा पठ्ठा विरुद्ध पै. रोहन रंडे, मुरगुड मंडलिक कुस्ती आखाडा दादा लवटे यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. कै. जगन्नाथ अनंता पालवे यांच्या स्मरणार्थ श्री. बापू जगन्नाथ पालवे उद्योजक, श्री. महादेव नरूटे उद्योजक यांच्या वतीने इनाम रुपये ५१ हजार रुपयांसाठी पै. सोमनाथ सिद, सदाशिवनगर कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा विरुद्ध पै. संभाजी कारंडे, इचलकरंजी वस्ताद अमृता भोसले यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. श्री. जयवंत पालवे माजी सरपंच, श्री .हनुमंत टेळे माजी सरपंच, श्री. शिवाजी गोफणे (दादा), श्री. दीपक दीक्षित (शेठ), श्री. एम. डी. ढोबळे सर यांच्या वतीने इनाम रुपये ५१ हजार रुपयांसाठी पै. प्रकाश कोळेकर, सदाशिवनगर कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा विरुद्ध पै. प्रणव हांडे, खुडूस वस्ताद महादेव ठवरे यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. श्री. विठ्ठल पालवे ग्रामपंचायत सदस्य, श्री. तात्याबा शिंदे ग्रामपंचायत सदस्य, श्री. नाथा सीद ग्रामपंचायत सदस्य, महादेव पालवे तंटामुक्ती अध्यक्ष, श्री. ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीने इनाम रुपये ५१ हजार रुपयांसाठी पै. हर्षद मोटे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल अर्जुनवीर पुरस्कार काका पवार पुणे यांचा पठ्ठा विरुद्ध पै. प्रसाद सासने, इचलकरंजी वस्ताद अमृता भोसले यांचा पठ्ठा यांच्या लढत होणार आहे. कै. पै. संजय शेंडगे यांच्या स्मरणार्थ पै. सतीश शेंडगे, कै. पार्वती व कै. भीमराव कुंभार यांच्या स्मरणार्थ, शिवाजी कुंभार यांच्या तर्फे व मुन्नाभाई मुलाणी यांच्यातर्फे इनाम रुपये ५१ हजार रुपयांसाठी पै. युवराज झंजे, मांडवे कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा विरुद्ध पै. सौरभ मारकड, खुडूस वस्ताद महादेव ठवरे यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे.

तसेच या मैदानामध्ये उद्घाटनाची कुस्ती श्री. पिनू पालवे ग्रामपंचायत सदस्य, श्री. राजू शिंदे माजी उपसरपंच, श्री. प्रमोद पालवे यांच्यातर्फे पैलवान आर्यन रुपनवर, नातेपुते वस्ताद शंकर काळे यांचा पठ्ठा विरुद्ध पै. गोल्डन जावीर, मांडवे वस्ताद हनुमंत तात्या शेंडगे यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. त्याचबरोबर डॉ. तात्याबा रुपनवर, श्री. कुंभार मामा (मेजर) यांच्या वतीने पै. शंभू शेळके, मांडवे वस्ताद हनुमंत तात्या शिंदे यांचा पठ्ठा विरुद्ध पैलवान अमोलराज पाटील, नातेपुते वस्ताद शंकर काळे यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे.
सदर कुस्ती मैदानाच्या अधिक माहितीसाठी पै. सतीश शेंडगे – 9145207265, पै. अक्षय जावीर – 9552448917,पै. माऊली गोफणे – 9561201718, पै. दादा बनकर – 8600939580, पै. रामभाऊ गोफणे – 7028113030 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. सदर कुस्ती मैदानाचे समालोचन पैलवान युवराज केचे सर हे करणार आहेत. तरी वस्ताद, मल्ल सम्राट आणि कुस्ती शौकीन यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.