वेळापूर येथे आण्णा भाऊ साठे यांना अभिवादन…!

वेळापूर (बारामती झटका)
‘रडगाणे नाही मला लढा मान्य आहे’, असे अवघ्या विश्वाला ठासून सांगणारे, थोर साहित्यिक, साहित्यसम्राट, साहित्यरत्न, लोकशाहीर, डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या ५४ व्या पुण्यतिथीनिमित्त एसटी स्टँड येथील अर्धाकृती पुतळ्यास वेळापूर पोलिस स्टेशनचे एपीआय निलेश बागाव साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी डॉ. राजकुमार वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय ब्लड बँक सोलापूर यांनी सहकार्य केले.

या कार्यक्रमासाठी सरपंच रजनिश बनसोडे, निमगावचे सरपंच सुभाष साठे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे, रिपाईचे तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, माजी उपसरपंच जावेद मुलाणी, तलाठी भाऊसाहेब तोरके, बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक किरण साठे, रघुनाथ साठे, माळशिरसचे नगरसेवक कैलास वामन, बहुजन मुक्ती पार्टीचे सौरभ वाघमारे, आबासाहेब वाघमारे, भारतीय दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव राजाभाऊ सकट, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ मदने, तालुकाध्यक्ष गणेश खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य अरुण साठे, हनुमंत वायदंडे, वंचितचे प्रदीप सरवदे व सकल मातंग समाज बांधव उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री. महेंद्र साठे, अजितदादा साठे, पत्रकार अमोल साठे यांनी केले होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng