मनसेच्या वतीने आरोपींना तात्काळ फाशी देण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना माळशिरस तालुक्याच्यावतीने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसे नेते दिलीप बापु धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
बदलापुर येथील लहान चिमुकल्यांवर जो अमानुष प्रकार घडला, त्यातील आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका रेश्माताई टेळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे तालुका अध्यक्ष सुरेश टेळे, तालुका सचिव लक्ष्मण नरोटे, तालुका उपाध्यक्ष बाबा ननावरे, तालुका उपाध्यक्ष रोहित खाडे, महिला सेना मंगलताई चव्हाण, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अक्षय बावकर, तालुका प्रसिद्धीप्रमुख फिरोजभाई शेख, तालुका संघटक अजित पवार, दादा भांड, विभाग अध्यक्ष प्रशांत कुचेकर, विभाग अध्यक्ष अजित जाधव असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.