माळशिरस येथील ज्ञानसेतू अभ्यासिकेत बसणेसाठी प्रवेश परीक्षा
माळशिरस (बारामती झटका)
सर्व ज्ञानसेतु आभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांना तसेच माळशिरस तालुक्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्यांना सुचना, शनिवार दि. ०१/०४/२०२३ रोजी सकाळी ११.०० वा. ज्ञानसेतू अभ्यासिकेत बसणेसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. जे विद्यार्थी प्रवेश परीक्षेस अनुपस्थित राहतील त्यांना ज्ञानसेतू अभ्यासिकेत प्रवेश निश्चित केला जाणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
प्रवेश परीक्षेनंतर पात्र विद्यार्थ्यांना नाममात्र मासिक फी आकारली जाणार आहे. प्रवेश परिक्षेसाठी दि. ३१/०३/२०२३ सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत नोंदणी ज्ञानसेतू अभ्यासिकेत 7387899090 रोहित सरांकडे करावी. पुर्व नोंदणी असल्याशिवाय परिक्षेसाठी बसता येणार नाही, असे माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ कर्णवर पाटील यांनी आव्हान केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng