ताज्या बातम्या

मराठी पत्रकार संघाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी कृष्णा लावंड यांची निवड

अकलुज (बारामती झटका)

सोलापुर येथे धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे अधिकृत नोंदणी असलेल्या व मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संलग्नित मराठी पत्रकार संघ, माळशिरस पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी कृष्णा लावंड तर उपाध्यक्षपदी अनंत दोशी आणि शिवाजी पालवे यांची एकमताने निवड करण्यात आली.

मराठी पत्रकार संघ माळशिरस ही संघटना माळशिरस तालुक्यातील एक नोंदणीकृत पत्रकार संघटना असुन अकलुज येथे दि. 25 फेब्रुवारी रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड बैठक संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष कृष्णा लावंड, उपाध्यक्ष (पश्चिम) अनंत दोशी, (पुर्व) उपाध्यक्ष शिवाजी पालवे, सचिव दै. पुढारीचे मंगेश सोनार, खजिनदार, दै. सकाळचे विलास साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार चंद्रहास सिदवाडकर, रामचंद्र मगर, किरण जाधव आदी उपस्थित होते.

या संघटनेमध्ये तालुक्यातील नामांकित दैनिके आणि साप्ताहिक वर्तमान पत्रांचे प्रतिनिधी सदस्य आहेत. 2017 साली संस्थापक किरण जाधव यांनी नोंदणी केलेली आहे. आजपर्यंत माळशिरस येथील जेष्ठ पत्रकार चंद्रहास सिदवाडकर, श्रीपुर येथील मनोज गायकवाड यांनी अध्यक्षपदाची धुरा संभाळली आहे. तसेच जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार, निमगाव (म.) येथील रामचंद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने आजपर्यत हेल्मेट वाटप, डॉ. एम. के. इनामदार यांच्या हाॕस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी यासारखे उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी नुतन अध्यक्ष कृष्णा लावंड यांनी सांगितले.

भविष्यातही संघटना पत्रकारांच्या आरोग्याविषयी जागृत राहुन पत्रकारांसाठी प्रामाणिक कार्य करणार आहे. पत्रकारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असुन विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी नुतन अध्यक्ष कृष्णा लावंड यांनी सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

7 Comments

Leave a Reply

Back to top button