मारकडवाडी येथील श्री क्षेत्र वश्या मारुती देवस्थान कामाची ताबा पावती मिळण्यासाठी गटविकास अधिकारी यांना पत्रव्यवहार….

….अन्यथा माळशिरस पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा बेस्ट मॅन्युफॅक्चरर मॅनेजर व्हि.डी. जामदार यांचा इशारा..
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील श्री क्षेत्र वश्या मारुती येथे नाविन्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेत नवीन यांत्रिकी बोटी खरेदी करून अनेक दिवस झाले. ग्रामपंचायतीची कामाची ताबा पावती मिळाली नसल्याने सदर कामाचे देयक जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे शिल्लक आहे. सदरच्या कामाची ताबा पावती मिळण्यासाठी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना स्पीड पोस्ट व मेलद्वारे बेस्ट मॅन्युफॅक्चरर मॅनेजर व्हि. डी. जामदार यांनी पत्रव्यवहार करून ताबा पावती न मिळाल्यास माळशिरस पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे…


माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात सदाशिवनगर, तामशिदवाडी, मारकडवाडी या तिन्ही गावच्या सीमेवर निसर्गरम्य व स्वयंभू नवसाला पावणारा मारकडवाडी येथील हनुमान नगर गोरेवस्ती येथे श्री क्षेत्र वश्या मारुती देवस्थान आहे. सदरच्या ठिकाणी नाविन्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली उप अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन यांत्रिकी बोटी खरेदी करण्यात आलेल्या आहेत. कामाची ताबा पावती नसल्याने अद्यापपर्यंत बेस्ट मॅन्युफॅक्चरर प्रोप्रायटर व्हि. डी. जामदार यांनी सदर कामाचे देयक जिल्हा परिषदेकडे शिल्लक असल्याने बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे.
सदरच्या पत्रामध्ये, वरील संदर्भीय कार्यारंभ आदेशानुसार आम्हाला काम मिळाले होते. सदर कामांतर्गत सर्व साहित्य आम्ही ऑगस्ट 2024 मध्येच श्री क्षेत्र वश्या मारुती देवस्थान मारकडवाडी, ता. माळशिरस येथे पोहोच केलेले होते. तरी अद्यापपर्यंत आम्हाला ताबा पावती देण्यात आली नाही. त्यामुळे सदर कामाचे देयक अजून जिल्हा परिषद सोलापूरकडे शिल्लक आहे.

सदर कामाची ताबा पावती देण्यास सदर ग्रामपंचायत मारकडवाडी यांना त्वरित कळवावे अथवा आपल्या स्तरावर सदर कामाची ताबा पावती आम्हास द्यावी. अन्यथा आम्हास पंचायत समिती माळशिरस कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. तरी कृपया आमच्या मागणीची दखल घ्यावी, ही विनंती. अशा प्रकारे पत्र व्यवहार माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेला आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



