सयाजीराजे वॉटरपार्कची तपास अधिकारी अकलूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी कसून चौकशी करावी…

मोहिते पाटील यांच्या सयाजीराजे वॉटरपार्कमध्ये निष्पाप जीवाचा बळी गेलेला आहे, कुटुंब उघड्यावर पडलेले आहे, शासनाने दखल घ्यावी मयताच्या नातेवाईकांची मागणी….
अकलूज (बारामती झटका)
अकलूज, ता. माळशिरस येथील मोहिते पाटील यांच्या सुप्रसिद्ध सयाजीराजे वॉटरपार्कच्या व्यवस्थापक ऑपरेटर व संबंधित विभागाचे कर्मचारी यांच्यावर अकलूज पोलीस स्टेशन येथे तक्रारदार अभिजीत शशिकांत धुमाळ रा. विरवाडी भिगवन, ता. इंदापूर यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (बी एन एस) 2023 कलम 106 ( 1 ) 125( a) 125 ( b) 3 ( 5) नुसार अकलूज पोलीस स्टेशन येथे 19/ 06/ 20 25 रोजी गुन्हा नोंद झालेला आहे.
अभिजीत शशिकांत धुमाळ, वय 34 वर्ष, व्यवसाय – नोकरी रा. विरवाडी भिगवन, ता. इंदापूर जि. पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झालेला आहे.
दिलेल्या तक्रारीमध्ये व्यवस्थापक ऑपरेटर व इतर संबंधित लोकांनी ऑक्टोपस पाळण्याची देखभाल व्यवस्थित न केल्याने सदरचा अपघात घडणेस कारणीभूत झालेले आहेत. म्हणून माझी सयाजीराजे वॉटरपार्कचे व्यवस्थापक ऑपरेटर व संबंधित विभागाचे कर्मचारी यांचेविरुद्ध तक्रार आहे. तसेच मूळ व्यवस्थापक यांचे विरुद्ध तक्रार आहे. अशा तक्रारी अर्जावरून अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला आहे. सदरच्या गुन्ह्याचा अकलूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्याकडे तपास आहे.
तपास अधिकारी श्री. विक्रम साळुंखे यांनी व त्यांच्या टीमने सयाजीराजे वॉटरपार्कची कसून चौकशी करावी, असे निष्पाप जीवाचा बळी गेलेल्या मयताच्या नातेवाईकांकडून मागणी होत आहे. मयत तुषार धुमाळ यांचे कुटुंब उघड्यावर पडलेले आहे. सयाजीराजे वॉटरपार्कला अधिकृत मान्यता आहे का ?, वॉटर पार्कमधील पाळणे व इतर मशनरी कधी खरेदी केलेल्या आहेत ?, खरेदी केलेल्या मशिनरीची किती वर्षापर्यंत कालमर्यादा आहे ?, मशिनरींची तपासणी किती वर्षातून केली जाते व त्याची तपासणी अहवाल प्रति तपासाव्यात ?, सयाजीराजे वॉटरपार्कला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत का त्याच्या नोंदी तपासून घ्याव्यात ?, सयाजीराजे वॉटरपार्क मध्ये वापरण्यात आलेल्या जमिनीच्या शेतसारा किंवा महसूल भरलेला आहे का ?, जमीन शेती का ?, बिगर शेती आहे ?, याची खातरजमा करावी ?, सयाजीराजे वॉटरपार्क जागेतील जमिनीचा मूळ मालक कोण आहे ?, किंवा सदर जमिनीचा करार केलेला आहे ?, सयाजीराजे वॉटरपार्क सुरू करण्यास शासकीय परवानगी घेतली आहे का ?, पार्कमधील कर्मचारी कायम व रोजंदारीवर किती आहेत ?, सयाजीराजे पार्कची पर्यटनमध्ये नोंद असेल तर कोणत्या तारखेपासून आहे याची माहिती घ्यावी ?, पर्यटक यांना दिलेली तिकीट अथवा पावती यावर जीएसटी नंबर आहे का ?, सयाजीराजे वॉटरपार्कची पर्यटन विभागाकडे नोंद असेल तर दरवर्षी ऑडिट केले जाते का ?, सयाजीराजे वॉटरपार्क मधील कर्मचारी व पर्यटक यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केलेल्या आहेत का ?, कर्मचाऱ्यांना वेतन रोख रक्कम किंवा बँकेत दिले जाते का ?, सयाजीराजे वॉटरपार्क मधील अन्नपदार्थ यांची अन्नभेसळ अधिकाऱ्यांनी चौकशी केलेली आहे का ?, यापूर्वी सयाजीराजे वॉटरपार्कमध्ये असे अपघात घडलेले आहेत का ?, अशा सर्व बाबींची कसून चौकशी करावी, अशी मयत धुमाळ यांच्या नातेवाईकांकडून मागणी होत आहे. सदरचा तपास योग्य पद्धतीने न झाल्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क केला जाईल, असे मयत धुमाळ यांच्या नातेवाईकांमधून बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



