ताज्या बातम्याराजकारण

“मतदारांचा कानोसा” भाजपची उमेदवारी भूषण कांबळे यांना देऊन भाजप एका नेत्याला उत्तमराव जानकर यांची नुरा कुस्ती निवडणूक लावायची का ?

माळशिरस विधानसभा मतदार संघात भाजपच्या मतदारांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आलेले आहे..

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. महाविकास आघाडीकडून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांची उमेदवारी लोकसभेच्या निवडणुकीतच जाहीर झालेली आहे. महायुतीमध्ये भाजपला माळशिरस विधानसभा आहे. भाजपची उमेदवारी भूषण कांबळे यांना देऊन भाजप नेत्याला उत्तमराव जानकर यांची नुरा कुस्ती निवडणूक लावायची का ?, असा मतदारांचा कानोसा घेतल्यानंतर माळशिरस विधानसभा मतदार संघात भाजपच्या मतदारांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आलेले आहे.

गतवेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर व भाजपचे राम सातपुते त्यांच्यामध्ये लढत होऊन आमदार राम सातपुते विजयी झालेले होते. माळशिरस विधानसभा मतदार संघात विकासकामांच्या व मतदारांच्या सकारात्मक भूमिकेमुळे भारतीय जनता पार्टीकडून आमदार राम सातपुते, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैया सुळ पाटील, भाजपचे अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस अतुलशेठ सरतापे यांची नावे माळशिरस विधानसभेसाठी चर्चेत आहेत. अशामध्येच माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बार्शी येथील भूषण कांबळे यांच्या उमेदवारीसाठी वरिष्ठांकडे घाट घातला असल्याची चर्चा माळशिरस तालुक्यात रंगलेली आहे.

मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधी गट एकत्र येऊनसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला 65 हजार मते पडलेली होती. त्यामुळे माळशिरस विधानसभेत निश्चितपणे नियोजनबद्ध उमेदवारी व प्रचार यंत्रणा राबविल्यानंतर चित्र वेगळे दिसेल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवाजीराव कांबळे यांचे चिरंजीव भूषण कांबळे आहेत. वडिलांचा राजकीय वारसा घेऊन माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत उभा करण्याचा भाजपच्या नेत्यांचा मनसुबा आहे. भूषण कांबळे यांच्यावर प्रेम आहे म्हणून नाही तर उत्तमराव जानकर यांच्या निवडणुकीत नुरा कुस्ती करून उमेदवारी अर्ज भरतानाच गुलाल टाकायचा आहे का ?, असा संतप्त सवाल भारतीय जनता पार्टी मधून येत आहे.

भारतीय जनता पार्टीने आमदार राम सातपुते, डॉ. आप्पासाहेब देशमुख, किशोरभैया सुळ पाटील, अतुलशेठ सरतापे यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांना विजयासाठी मतमोजणीपर्यंत थांबावे लागेल, अशीही चर्चा माळशिरस विधानसभा मतदार संघात महायुतीच्या मतदारांमधून येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button