मविआचे जागावाटप; ठाकरे-पवारांचे ‘होमवर्क’
बुधवारच्या बैठकीपूर्वी दीड तास केली चर्चा
मुंबई (बारामती झटका)
महाविकास आघाडी जागावाटपाबाबत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बुधवारी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक घेतली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीची भूमिका आणि काही जागांवर अडलेले जागावाटप याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली.
महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. त्यात नव्याने सामील झालेल्या वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या भूमिकेमुळे आघाडीची मोठी अडचण झाली आहे. वंचितला सोबत घेण्याबाबत पवार आणि ठाकरे दोघेही आग्रही असल्याने नेमक्या किती जागा त्यांना सोडता येतील याची चाचपणी सिल्व्हर ओकवरील बैठकीत करण्यात आल्याचे समजते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. त्यामुळे उद्या होणाऱ्या चारही पक्षांच्या बैठकीत जागावाटप अंतिम होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला २३ जागा सोडण्यात येणार असून यामध्ये वंचितला जागा देण्यात येणार आहेत. ठाकरे गट २० जागा लढविण्याच्या तयारीत आहे. सर्व ४८ जागांचे वाटप लवकरात लवकर करणे आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचारसभांचे नियोजन यावर विस्तृत चर्चा या बैठकीत झाली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Great information shared.. really enjoyed reading this post thank you author for sharing this post .. appreciated
I just like the helpful information you provide in your articles