ताज्या बातम्यासामाजिक

माऊली तुम्हाला आणखी काही हवं का ?

झेडपी अधिकाऱ्यांकडून वारकऱ्यांची आस्थेने विचारपूस

सोलापूर (बारामती झटका)

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाच्या ओढीने पालखी सोहळ्याबरोबर पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांशी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी संवाद साधला. माऊली आणखी काही हवं का ?, असं विचारल्यावर वारकरी म्हणाले, साहेब खूप चांगली सोय झाली. अंगदुखीसाठी गोळ्याबरोबर मसाजर ठेवला त्यामुळे आमचे आरोग्य चांगले राहणार, असे उत्तर आले.

आषाढी वारीचा सोहळा समीप येऊन ठेपला आहे. संतांच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले आहे. रिंगण सोहळ्याने वारकऱ्यांच्या आनंदाला सीमा राहिलेली नाही. पालखी मार्गावर सर्वत्र माऊली, माऊलीचा गजर सुरू आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषद व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. वारकऱ्यांना निवास, आरोग्य, स्वच्छता, शौचालय, स्नानगृह अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. या उपरी वारकऱ्यांना काही अडचणी भेडसावत आहेत का, हे जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथे वारकऱ्यांमध्ये जाऊन संवाद साधला. सीईओ जंगम यांनी ज्येष्ठ वारकऱ्यांशी संवाद साधून आणखी काय सुविधा करता येतील, याची माहिती जाणून घेतली. त्यावर वारकऱ्यांनी प्रशासनाने राबविलेल्या यंत्रणेबाबत समाधान व्यक्त केले. पालखी सोहळ्याबरोबर चालल्याने शरीराला मोठ्या प्रमाणावर थकवा जाणवतो. पाय व अंग दुखीचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. यासाठी बरेच वारकरी पालखी मार्गावर असलेल्या औषध सुविधा केंद्राचा आधार घेतात. अंगदुखीचा सामना करण्यासाठी पेन किलर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. पण या वेळेस जिल्हा परिषद प्रशासनाने मसाजरची सोय केल्याने पेनकिलरचा वापर कमी झाला. मसाजरमुळे आराम पडल्यामुळे भाविकांनी प्रशासनाचे आभार मानले. पेन किलरच्या साईड इफेक्ट पासूनही चांगले आरोग्य लाभल्याच्या भावना वारकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री औषधांचाही वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आहे. या औषधाला मेडिकल प्रमाणे सजावट केल्यामुळे वारकऱ्यांना औषधालयाची सहजपणे माहिती झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या या कल्पनेबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दोन दिवसात २४ हजार वारकरी
पालखी मार्गावर उपलब्ध केलेल्या फूट मसाजर सेवा केंद्राची दोन दिवसात २४ हजार वारकऱ्यांनी लाभ घेतला आहे. वारकऱ्यांनी फूट मसाजर मशीनचा वापर केला ती संख्या पुढीलप्रमाणे आहे –
दि. 30 जून – धर्मपुरी – 2148, कारूंडे – 4878, शिंगणापूर फाटा – 840, नातेपुते -1617.

वारकऱ्यांनी फूट मसाजर मशीनचा वापर केला संख्या संध्याकाळी दहा पर्यंत (सेंटर वाईज)
दि. 1 जुलै – मांडवे- शिंगणापूर पाटी – 635, सदाशिवनगर पेट्रोल पंप – 380, सदाशिवनगर जुने रिंगण तळ – 523, माळशिरस – 3510, खुडूस – 780, अकलुज – 662, संग्रामनगर – 1280, यशवंतनगर – 895.

दि. 2 जुलै – विजोरी 634, जैन मंदिर वेळापूर – 880, वेळापूर पालखीतळ – 800,
बोरगाव – 3567.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom