ताज्या बातम्यासामाजिक

माऊलींच्या स्वागत समारंभात निर्मल वारीचा जागर…

भाविकांनो स्वच्छतेला प्राधान्य द्या, पालकमंत्री यांचे भावनिक आवाहन ..

धर्मपुरी (बारामती झटका)

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आज निर्मल वारीचा जागर करण्यात आला. आषाढी वारी निर्मल वारी करा, असे भावनिक आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सपत्नीक करून माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, मा. आमदार राम सातपुते, मा. आमदार रामहरी रूपनवर, अप्पर मुख्य सचिव मनिषा वर्मा, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, सातारा चे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सातारा सिईओ याशिनी नागराजन, जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर, विशेष कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे, विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

आषाढी यात्रा निर्मल करा – पालकमंत्री जयकुमार गोरे
आषाढी यात्रेनिमित्त येणार्या प्रत्येक भाविकांचे स्वागत करताना आनंद होत असल्याचे सांगून पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, आषाढी वारी निर्मल वारी करा. प्लास्टिक कुठेही टाकू नका. प्लास्टिक संकलन केंद्रात टाका. कचरा इतरत्र फेकू नका. शौचालयाचा वापर करा. स्नानगृहाचा वापरा करा. निर्मल वारी स्वच्छ वारी झाली पाहिजे, यासाठी सहकार्य करा, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

कला पथकांनी केला निर्मलवारीचा जागर
राष्ट्रपतींच्या समोर कला सादर केलेले दत्तात्रय येडवे व संजय बिदरकर यांनी विनोदी शैलीत स्वच्छतेचे महत्व वारकरी यांना पटवून दिले. स्वच्छता व निर्मल वारीचा जागर या निमित्ताने झाला. या प्रसंगी प्रसिध्द भारूडकीर चंदाताई तिवारी व संध्या तिवारी यांनी पर्यावरणाचा जागर केला.

मुख्यमंत्री सहाय्यता फिरते आरोग्य केंद्राचा शुभारंभ….
सोलापूर जिल्ह्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते फिरते आरोग्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचे हस्ते फित कापण्यात आली. महिला बाल कल्याण विभागाच्या महिला सहाय्यता कक्ष, फिरते वाहन व डिजिटल चित्ररथांचा शुभारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मोबाईल, मोटारसायकल, अॅम्बुलन्सचा शुभारंभ करण्यात आला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचे हस्ते बॅटरी चार्जिंग व्हॅन चा शुभारंभ फित कापून करण्यात आला.

पालकमंत्री नियोजनावर खुश, मात्र बारीक लक्ष ठेऊन सेवा देणेचे आवाहन…
शौचालय, स्नानगृह, मुख्यमंत्री सहायता निवारा कक्ष, चरणसेवा, मुख्यमंत्री सहायता मोबाईल आरोग्य व्हॅन , मोबाईल बॅटरी चार्जिंग या सर्व नियोजनात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी समाधान व्यक्त केले आहे. सिईओ कुलदीप जंगम व अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी विशेष मेहनत घेऊन सहाय्यता कक्ष व सुविधांचे नियोजन केले आहे. सर्व सुविधांचा लाभ भाविकांना देण्यासाठी कटाक्षाने लक्ष द्या असे आवाहन केले.

सेवेची ठायी तत्पर….
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात शिंगणापूर फाटा येथील मुख्यमंत्री सहाय्यता निवारा कक्षात आज जिल्हा परिषदेकडे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आज खाली जमिनीवर बसून वारकरी बांधवांशी संवाद साधला. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी जेव्हा सेवेसाठी जमिनीवर बसून वारकरी यांच्याशी संवाद साधतात, तेंव्हा चालून चालून थकलेल्या वारकरी यांनी देखील मन मोकळे करून मुक्त कंठाने ग्रामविकास विभागाने वारकरी यांच्यासाठी दिलेल्या सुविधांचे कौतुक केले. सोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी सर्व सुविधाची माहिती या प्रसंगी दिली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button