मेडद पंचायत समिती गणातून माजी सरपंच नाथाआबा लवटे पाटील यांच्या उमेदवारीची गावातून व गणातून मागणी…

मेडद (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांचा श्रीराम बंगला निवासस्थानी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक गावातील नेते व कार्यकर्त्यांची उमेदवारांविषयी चर्चा व सुसंवाद सुरू आहे. संग्रामनगर जिल्हा परिषद गटातील मेडद पंचायत समिती गणातून मेडद गावचे माजी सरपंच नाथाआबा लवटे पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मेडद गावातील नेते व कार्यकर्ते यांनी मागणी केलेली आहे. यावेळी सचिन लवटे मा. सरपंच, भगवान झंजे मा. सरपंच, महादेव काळे ग्रा. सदस्य, माऊली सोनटक्के ग्रा. सदस्य, लाला झंजे भा. ज. अध्यक्ष, मधुकर काळे, भिमराव वळकुंदे, माणिक सोनटक्के, सदाशिव काळे, आप्पा हांगे, आनंदा पाटील, दत्ता ठेंगल, राजू नामदास, भागवत नामदास, आबा भिसे, पिंटू झंजे, बाळू काळे, नवनाथ पवार, अक्षय केमकर, अजय काळे, विकी सोनटक्के, सुलतान शेख, सुरेश पाटील, महादेव वाघमोडे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

आजपर्यंत मोहिते पाटील यांच्या विरोधामध्ये मेडद पंचायत समिती गणाचे सदस्य निवडून आणलेले आहेत. लोकसभा व विधानसभेपेक्षा जास्त मताधिक्य जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू. मेडद पंचायत समिती गणातील तिरवंडी, उंबरे, दहिगाव, कचरेवाडी, प्रतापनगर, कोंडबावी या गावातील नेते व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. नाथाआबा लवटे पाटील यांचा पंचायत समिती उमेदवारीसाठी विचार करावा, असा उपस्थित नेते व कार्यकर्त्यांनी सूर धरलेला होता.
लवकरच मेडद पंचायत समिती गणातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्नेह मेळावा घेऊन भाजपमध्ये पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्याचा उपस्थितांनी मानस बोलून दाखवला. यावर माजी आमदार राम सातपुते यांनी भाजपचे पक्षश्रेष्ठी व शिष्टमंडळ यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेऊ असे उपस्थित नेते व कार्यकर्त्यांना सांगितले…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



