मेडद येथे श्रीनाथ यात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्रीनाथ यात्रेत हिंदवी पाटील पुणेकर प्रस्तुत हिऱ्याची हिरकणी कार्यक्रम आणि जंगी कुस्त्यांचे मैदान होणार
मेडद (बारामती झटका)
मेडद ता. माळशिरस, येथे श्रीनाथ यात्रा महोत्सवानिमित्त श्रीनाथ यात्रा कमिटी ट्रस्ट मेडद व समस्त ग्रामस्थ मेडद यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. १२/०२/२०२५ रोजी सकाळी ४ ते ६ नदीवरून श्रीनाथाची पालखी व जलपूजा, सकाळी ६ ते ७ श्रींची महापूजा, सकाळी ७ ते ९ आरती, सकाळी ९ ते १२ नैवेद्य, प्रसाद, नवस, दुपारी ३ ते ६ गजी ढोल कार्यक्रम तर रात्री ९ ते १२ श्रीनाथ कथा व जागर अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच बुधवार दि. १२/०२/२०२५ रोजी रात्री ९ वाजता हिंदवी पाटील पुणेकर प्रस्तुत, हिऱ्याची हिरकणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. १३/०२/२०२५ रोजी पहाटे ४ वा. महाआरती व श्रींची रथातून भव्य मिरवणूक (छबिना) निघणार आहे. तर दुपारी ३ वा. भव्य जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी श्रीनाथ यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना भाविकभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीनाथ यात्रा कमिटी ट्रस्ट मेडद व समस्त ग्रामस्थ मेडद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.