मेहबुब शेख यांचे आरोप बिनबुडाचे – अक्षय भांड, कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्हा
माळशिरस (बारामती झटका)
सुपारी घेऊन तुतारी वाजवण्याचे काम मेहबुब शेख करत आहेत. आदरणीय अजितदादांनी महाराष्ट्रातील महिलांच्या हिताच्या दृष्टीने लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना लाभ मिळणार आहे, संसाराचा गाडा चालवत असताना महिल्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण, लाडकी बहिण योजनेमुळे महिलांना बळ मिळणार आहे. मेहबुब शेख सारखे अनेक सावत्र भाऊ या योजनेला विरोध करत आहेत पण, त्याने काही फरक पडणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभारले सर्व जाती धर्माचे लोक बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले. याचा आदर्श आपण आज पण घेतो. काही जण आज “शिवस्वराज्य” यात्रा काढत आहेत. ज्यामुळे स्वतःचा पक्ष वाढेल ही अपक्षा ठेवून हे गावोगावी फिरत आहेत. त्यामध्ये कोणतेही जनतेचे हीत नाही, युवकांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत, महिलांबाबतचे कोणते धोरण नाही, फक्त स्वतःचा पक्ष मोठा करण्याचा स्वार्थ मनात ठेऊन ही शिवस्वराज्य यात्रा आहे. तर, दुसरीकडे आमचे नेते आदरणीय अजितदादा जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरत आहेत. महिलांशी सवांद साधत आहेत, महिलांचे प्रश्न तातडीने सोडवत आहेत. कदाचित हे काम मेहबुब शेख आणि त्यांच्या गटातील नेत्यांना बघवत नाही म्हणून त्यांची घुसमट होत आहे. त्यामुळे ते बालिशपणाची वक्तव्य करत फिरत आहेत.
मोहळ मतदार संघातपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकत
आदरणीय राजन मालक यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय आमदार यशवंततात्या माने यांनी २५०० कोटी निधी मोहळ मतदारसंघाच्या विकासासाठी आणला आहे. व तेथील विकासकामेपण गतीने सुरु आहेत पण, मेहबुब शेख हे प्रसिद्धीसाठी हपापलेले नेतृत्व आहे. त्यामुळे ते बालिशपणाची वक्तव्य नेहमी करत असतात. मोहळची जनता हुशार आहे, ती विकास करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी राहील.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.