मोबाईलच्या वादात वयोवृद्ध महिलेचा खून केल्याप्रकरणी आरोपीला कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
माढा (बारामती झटका)
माढा तालुक्यातील मौजे सुरली येथील फिर्यादी मुकुंद चव्हाण यांच्या शेतालगतच असणारे समाधान सरडे यांच्या शेतात आरोपी कृष्णा दादासाहेब कांबळे हा शेतमजूर म्हणून कामास होता. दि. 21-06-2018 रोजी दुपारी 4-00 वा. सुमारास फिर्यादीची आई श्रीमती द्वारकाबाई चव्हाण ही शेतात भुईमुगाच्या शेंगा वेचत असता लाईट आल्याने ती विहिरीवरील मोटर चालू करण्यास गेली. मोटर चालू करून तिने उसाला पाणी दिले.
त्यादरम्यान तिने ठेवलेल्या ठिकाणी मोबाईल मिळून आला नाही. म्हणून बाजूच्या शेतात काम करणाऱ्या आरोपी कृष्णा यास मोबाईलबाबत विचारले असता त्या दोघांमध्ये भांडण झाले. तेव्हा तिचा पुतण्या योगेश चव्हाण यांनी भांडण सोडवले. त्यानंतर द्वारकाबाई कृष्णाने केलेल्या भांडणाबाबत त्याला घेऊन त्याच्या मालकाकडे जात असता, आरोपीने आपली बदनामी होईल या कारणाने रागाच्या भरात लोखंडी खोऱ्याचा तुंबा तिच्या डोक्यात मारून तिचा खून केला व तिचे शरीर फरपटत नेऊन उसामध्ये लपवून ठेवले. सदर बाबत फिर्यादी यांनी आरोपी कृष्णा दादासाहेब कांबळे रा. देवदैठण, ता. जामखेड, याचे विरुद्ध टेंभूर्णी पोलीस ठाणेस गु.र.नं. 276/2018 भा.द.वि.क 302 अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास API श्री. राजेंद्र मगदूम यांनी करुन आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा शाबितीसाठी 12 साक्षीदार तपासण्यात आले. यातील साक्षीदार व डॉक्टर यांची साक्ष तसेच तपासी अंमलदार यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले परिस्थितीजन्य पुरावे हे सरकारी वकिल श्रीमती राजश्री कदम यांनी मा. न्यायालयासमोर मांडले.
सरकारी पक्षाचा पुरावा याचा विचार करता मा. श्री. एल. एस. चव्हाण साहेब जिल्हा न्यायाधीश बार्शी यांनी आरोपी कृष्णा दादासाहेब कांबळे रा. देवदैठण, ता. जामखेड यास भादविक 302 अन्वये दोषी ठरवून जन्मठेप व 15,000/- रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
सरकार पक्षा तर्फे श्रीमती राजश्री कदम यांनी कायदेशीर बाबीवर जोरदार युक्तिवाद केला व काम पाहीले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी वेळोवेळी साक्षीदार, पुरावे हजर ठेवण्याचे काम पाहिले. सदर केसमध्ये मा. श्री. अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा व मा. श्री. दिपक पाटील पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस ठाणे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Mevlana su kaçak tespiti İstanbul’da su kaçağı tespiti yapmak isteyen herkese tavsiye ediyorum. Hizmet çok profesyoneldi. https://kiigasofthub.com/ustaelektrikci