मोदींना पंतप्रधान करण्यासाठी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून द्या – माजी आमदार जयवंतराव जगताप
करमाळा (बारामती झटका)
नरेंद्र मोदी हे देशाचे कणखर नेतृत्व असून या धाडसी नेतृत्वामुळे संपूर्ण जगात भारत देशाची दहशत असून देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. देशाचे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे काळाची गरज असून त्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले. विकी मंगल कार्यालयात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार संजय मामा शिंदे, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे, कार्याध्यक्ष सुजित तात्या बागल, भाजपचे गणेश चिवटे, जगदीश अग्रवाल, रामभाऊ ठाणे, दीपक चव्हाण, किरण बोकन, शिवसेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, शहर प्रमुख संजय शिलवंत, युवा सेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंड, युवा सेना जिल्हा समन्वित निखिल चांदगुडे, महिला आघाडी अध्यक्ष प्रियंका गायकवाड, भाजपच्या डोके मॅडम, आणि राऊत मॅडम, सुनिता नष्टे, जेऊर शिवसेना शहर प्रमुख सुरेश करचे, युवा सेना शहरप्रमुख महादेव सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयवंतराव जगताप म्हणाले की, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या काळात अनेक विकासाची कामे केली असून आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करमाळ्यातील प्रलंबित कामे सुरू आहेत. गतवर्षी हे दोघेजण एकमेकांच्या विरोधात होते, आताही एकत्र आले आहेत. यामुळे करमाळा तालुक्यातून मताधिक्य मिळणार यात कुठलीही शंका नाही. कुठल्याही भावनेचे राजकारण न करता देशाचे हित डोळ्यापुढे ठेवून लोकसभा निवडणुकीला आपण सामोरे गेले पाहिजे.
आज संपूर्ण जगात हिंदुस्तान ही एक महासत्ता होत असून नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दृष्टीने आगामी काळात हिंदुस्थान जगातील एक नंबर देश होणार आहे. यासाठी खासदार नाईक निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले.
माजी आमदार जयवंतराव जगताप यांची करमाळा तालुक्यात मोठी ताकद असून १८ पगड सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. संजयमामा शिंदे यांना आमदार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता आता त्यांनी खासदार निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे खासदार निंबाळकरांचे पारडे जड झाले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Wonderful perspective! The points you made are very enlightening. For further information, visit: DISCOVER MORE. Excited to hear your views!