मोहिते पाटील गटाच्या माळीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुपमा एकतपुरे यांचा तडकाफडकी राजीनामा उलट सुलट चर्चा सुरू…

माळीनगर (बारामती झटका)
माळीनगर, ता. माळशिरस ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. अनुपमा एकतपुरे यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला असल्याने उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे. माळीनगर ग्रामपंचायत सरपंच पद ओबीसी महिलेसाठी राखीव होते. पावणेदोन वर्षापूर्वी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा पराभव करून मोहिते पाटील गटाच्या सौ. अनुपमा एकतपुरे सरपंच झालेल्या होत्या.

माळीनगर सारख्या प्रतिष्ठित ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अनुपमा एकतपुरे यांनी राजीनामा दिल्यानंतर उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे. ग्रामपंचायत अंतर्गत कामकाजातील त्रासाला कंटाळून राजीनामा दिल्याची चर्चा माळीनगर पंचक्रोशीत सुरू आहे. राजीनामा दिल्यानंतर सरपंच अनुपमा एकतपुरे बाहेरगावी गेल्या असल्याची चर्चा सुरू आहे. भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु, संपर्क झालेला नसल्यामुळे खरे राजीनामा देण्याचे कारण काय आहे, याचा उलगडा अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही.
कानोसा घेतला असता ग्रामपंचायत अंतर्गत कामकाजातील त्रासाला कंटाळून राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरू आहे. रंजनभाऊ गिरमे यांनी मदतीचा विश्वास दिलेला होता, तरीसुद्धा राजीनामा दिलेला आहे. सदरचा राजीनामा पडताळणीसाठी ग्रामपंचायतीमध्ये आल्यानंतर राजीनामा मंजूर होईल की नाही, अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. सध्या तरी मोहिते पाटील गटाच्या माळीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अनुपमा एकतपुरे यांचा तडकाफडकी राजीनामा याची उलटसुलट चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



