ताज्या बातम्याराजकारण

मोहिते पाटील गटाला माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात खिंडार पडणार…

लोकप्रिय दमदार राम सातपुते व पाटील परिवार, दहिगाव यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा..

दहिगाव (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते दहिगाव येथील विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगानिमित्त रविवार दि. 27/04/2025 रोजी गेले असता उद्घाटन समारंभानंतर मोहिते पाटील गटाच्या माजी पंचायत समिती सदस्या स्वातीताई महेश पाटील व दहिगाव गावचे माजी उपसरपंच महेश प्रतापराव पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मोहिते पाटील गटाच्या माजी पंचायत समिती सदस्या सौ. स्वातीताई महेश पाटील व दहिगावचे माजी उपसरपंच महेश प्रतापराव पाटील यांच्या निवासस्थानी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचा पाटील परिवार यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी धर्मपुरी गावचे माजी सरपंच व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव काटकर, बाळासाहेब सरगर जिल्हाध्यक्ष किसान युवा मोर्चा, ज्येष्ठ नेते बाळासाहेब वावरे माळशिरस, संजय देशमुख नातेपुते, बाबुराव खिलारे, अध्यक्ष भाजप, सचिन खिलारे म. वी. से. अध्यक्ष, सचिन काटकर, मानसिंग पाटील, सचिन पाटील, जयदीप पाटील, राजेंद्र पाटील, गणेश खिलारे, नामदेव चव्हाण, हर्षवर्धन खंडागळे तसेच दहिगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आमदार राम सातपुते आणि पाटील परिवारातील सदस्य यांची बंद दाराआड बराच वेळ चर्चाही झाली. लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश सोहळा होण्याची आजच्या भेटीवरून अंदाज येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button