मोहिते पाटील घराण्यातील राजकीय चौथी विकेट जयाभाऊच्या गुगलीवर पडणार…

सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी पानीव येथील पक्षप्रवेशाच्या भाषणात जयाभाऊ आपणास बॅटिंग करण्यासाठी नव्हे तर गद्दारांची विकेट काढण्याची जबाबदारी आहे….
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्राच्या राजकारणात मोहिते पाटील घराण्याचे वेगळे राजकीय वजन असल्याचे वेळोवेळी समर्थक व कार्यकर्त्यांमधून बोलले जाते. राजकारणात मोहिते पाटील घराण्यातील तीन पराभव झालेले पहावयास मिळत आहेत. माळशिरस विधानसभेच्या वेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा पराभव परिवर्तनवादी स्वाभिमानी नेतृत्व शामराव पाटील यांच्याकडून झालेला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री पदावर मजल मारलेले विजयसिंह मोहिते पाटील यांचा सुद्धा सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील भारतनाना भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत पराभव केलेला आहे. अकलूज ग्रामपंचायत ही शिवरत्नवरील मोहिते पाटील यांच्याकडे स्थापनेपासून सत्ता असताना सुद्धा अकलूजचे व तालुक्याचे नेतृत्व करणारे जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे चिरंजीव संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा पराभव गिरीराज माने पाटील यांनी अकलूज ग्रामपंचायतीमध्ये पराभव केलेला आहे. मोहिते पाटील घराण्यातील तीन पराभव झालेले आहेत. सध्या पहिल्यांदाच अकलूज नगर परिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. मोहिते पाटील घराण्यातील तिसरी व चौथी पिढी निवडणुकीत उभा राहणार असल्याची मोहिते पाटील गोटातून व राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मोहिते पाटील कोणत्या पक्षातून अथवा आघाडीकडून लढतील हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, मोहिते पाटील यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्या सहकार्याने अकलूज नगर परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे मोहिते पाटील घराण्यातील तीन पराभव झालेले आहेत आता घराण्यातील राजकीय चौथी विकेट जयाभाऊच्या गुगलीवर कोणाची पडणार ?, याकडे लक्ष लागुन राहिलेले आहे.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा पहिल्यांदा पराभव करणारे स्वर्गीय शामराव पाटील पानीव यांच्या पाटील कुटुंबीयांनी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यावेळेस जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजनजी पाटील, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या थाटामाटात व दिमाखात संपन्न झालेला होता. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या अगोदर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भाषण झालेले होते. त्यावेळेस जयाभाऊ यांनी अनेक व्यक्तींनी बॅटिंग केलेली आहे, असे उद्गार काढलेले होते. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या भाषणामध्ये जयाभाऊ, बॅटिंग करण्याकरता नाही तर माळशिरस तालुक्यातील गद्दारांची विकेट काढण्याकरता आपल्यावर जबाबदारी आहे, असे म्हणताच उपस्थितांमधून जल्लोष झालेला होता. यावरून सोलापूर जिल्ह्यामधील गद्दारांना धडा शिकवण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. अकलूज नगर परिषद निवडणुकीमध्ये मोहिते पाटील विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाची निवडणूक होणार आहे. अकलूज नगर परिषद पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात होणार असल्याने मोहिते पाटील घराण्यातील चौथी राजकीय विकेट कोणाची पडणार आहे आणि खऱ्या अर्थाने अकलूज माळेवाडी मधील कोण जॉईंट किलर ठरणार, याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. याचा फैसला 03 डिसेंबर 2025 रोजी निकालादिवशी समजणार आहे..


जयाभाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीत राजकीय वारसा नसताना संघर्षमय जीवनामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात जनसामान्य माणसाच्या मनावर अधिराज्य करून माण-खटाव विधानसभा मतदार संघात सलग चौथ्या वेळी विजयी झालेले आहेत. रेशन धान्य दुकानदाराचा मुलगा प्रस्थापित घराण्यांना लढाई करून आलेले जयाभाऊ आहेत. त्यांना राजकारणाबरोबर क्रिकेटचाही चांगला अनुभव आहे. जीवनामध्ये क्रिकेट राजा हुकला तो संपला अशी राजकीय परिस्थिती असते. आजपर्यंत जयाभाऊ यांनी अनेकांच्या चेंडूवर षटकार, चौकार मारलेले आहेत. सध्या बॅटिंगपेक्षा बॉलिंगमध्ये जयाभाऊ यांना राजकीय इंटरेस्ट आहे. त्यामुळे अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीत गुगली वर गद्दारांची विकेट काढण्याची जबाबदारी असल्याची महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यात खुमासदार चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



