मोहिते पाटील समर्थकांनो, कहो दिलसे, रणजीतसिंह नाईक निंबाळकर माढा लोकसभेतून फिरसे…
माळशिरस (बारामती झटका)
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची पुनश्च उमेदवारी जाहीर झालेली आहे. मोहिते पाटील समर्थकांनो कहो दिलसे, रणजीतसिंह नाईक निंबाळकर माढा लोकसभेतून फिरसे…, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अनेक दिवसांपासून बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या सहकार्याने व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व कर्तव्यदक्ष विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचन, रस्ते, रेल्वे असे अनेक प्रलंबित प्रश्न सातत्याने पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावलेले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरण व विचारधारेला अनुसरून मतदार संघात काम केलेले आहे. देशाच्या टॉप टेन खासदारांमध्ये माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव अग्रगण्य होते. मात्र, मोहिते पाटील व मोहिते पाटील समर्थक यांच्याकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचे काम सुरू होते. तरीसुद्धा खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यावर कधीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. भारतीय जनता पक्षाचे देशातील वरिष्ठ नेते व महाराष्ट्रातील नेते यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघामध्ये कामाचा सपाटा सुरू केलेला होता. अनेक रखडलेल्या योजना मार्गी लावलेल्या आहेत.
खऱ्या अर्थाने रणजितसिंह नाईक निंबाळकर विकास कार्य व प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडणारे एकमेव खासदार ठरलेले आहेत. पक्षावरील निष्ठा व मतदार संघातील विकास कामे, मतदारांचा पाठिंबा यामुळेच खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाने पुनश्च उमेदवारी दिलेली आहे. यापूर्वीच बारामती झटका यांनी आपल्या बातम्यांमधून उमेदवारी मिळणारच, असे सूचक वक्तव्य केलेले होते. बारामती झटका वाचकांच्या मनामध्ये खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचा अंदाज खरा ठरला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
purchase ventolin inhaler: buy albuterol inhaler – buy ventolin over the counter uk
generic ventolin price
Rybelsus 7mg: Semaglutide pharmacy price – rybelsus price
ventolin 200: Buy Albuterol for nebulizer online – order ventolin online
indianpharmacy com: indian pharmacy – indian pharmacy online
buy drugs from canada: Cheapest online pharmacy – is canadian pharmacy legit
Поиск в гугле