मोहिते पाटील यांचा मराठ्यांकडून पराभव, आजपर्यंतचा राजकीय इतिहास आहे.
माढा लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षणामुळे मराठा मतदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे मताधिक्य वाढवतील परंतु, रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय रोखू शकणार नाहीत अशी राजकीय परिस्थिती
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्राच्या राजकारणात मोहिते पाटील गेली 50 ते 60 वर्ष राजकारणात कायम सत्तेत राहिलेले आहेत. असे असले तरीसुद्धा मोहिते पाटील यांचा मराठ्यांकडून पराभव झालेला आहे, हा आजपर्यंतचा राजकीय इतिहास आहे. माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा पानीव गावचे शामराव पाटील यांनी पराभव केलेला होता. मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा भारत नाना भालके यांनी केलेला होता. अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील यांचा गिरीराज माने पाटील यांनी पराभव केलेला होता, असा राजकीय इतिहास असताना माढा लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील व खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या लढत झालेली आहे. माढा लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षणामुळे मराठा मतदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे मताधिक्य वाढवतील परंतु, पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय रोखू शकणार नाहीत, अशी राजकीय परिस्थिती आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलेले होते. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटलेले होते. सरकारमध्ये समाविष्ट असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आरक्षण रखडले होते, अशी मराठा समाजामध्ये भावना झालेली होती. मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट करताना आरक्षण त्यांनी रोखले आहे, त्यांना सत्तेतून रोखा असे मराठा समाजास आवाहन केलेले होते
लोकसभेच्या निवडणुकीत पडसाद उमटत होते. माढा लोकसभेच्या निवडणुकीत अनेक उमेदवार आपले नशीब आजमावत होते. मात्र, खरी लढत महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत झालेली होती. योगायोगाने दोन्हीही मराठा समाजाचे उमेदवार आमने-सामने होते.
पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदार संघात सिंचन, रेल्वे, रस्ते व इतर विकास कामे केलेली असल्याने सर्वसामान्य जनता व मतदार महायुतीच्या पाठीशी ठाम उभे होते. महायुती सोबत मराठा समाज कमी होता, अशा परिस्थितीत इतर समाज एकवटून महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेले चित्र निर्माण झालेले होते.
माढा लोकसभा मतदार संघातील मराठा लोकप्रतिनिधी भाजपच्या सोबत होते. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मराठा व धनगर समाजास आरक्षण मिळावे, यासाठी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केलेला होता. यामुळेही मराठा व धनगर समाज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठाम उभा राहिलेला होता. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाची धग माढा लोकसभा मतदार संघात कमी प्रमाणात होती. तरीसुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांचे मताधिक्य मराठा समाज वाढवतील परंतु, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय इतर समाज पाठीशी असल्याने रोखू शकणार नाहीत, अशी राजकीय परिस्थिती आहे. आजपर्यंतचा मोहिते पाटील यांचा मराठ्यांकडून झालेल्या पराभवाचा राजकीय इतिहास पाहता खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील यांचा पराभव करतील, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
xnxx