ताज्या बातम्याराजकारण

मोहिते पाटील यांनी रणजीतसिंह नाईक निंबाळकरांचा नाद सोडला तर उत्तमराव जानकर यांच्या उमेदवारीकडे लक्ष केंद्रित..

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च लोकसभेची उमेदवारी मिळवून द्यावयाची नाही‌. यासाठी मोहिते पाटील परिवारातील तीन पिढ्या कामाला लागलेल्या होत्या. परंतु, कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघातील अनेक प्रलंबित असणारे प्रश्न त्यामध्ये रस्ते सिंचन रेल्वे यासह अनेक प्रश्न मार्गी लावून भारतीय जनता पक्ष तळागाळात व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवलेला होता. माढा लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकासकार्याचे गुणगौरव अनेक केंद्रातील व राज्यातील जबाबदार लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी कार्याचा आलेख जनतेसमोर मांडलेला होता. माढा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक तथा केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचाही माढा लोकसभा संवाद व मेळावा संपन्न झाला. त्यामध्ये सुद्धा खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा चढता आलेख पाहिल्यानंतर मोहिते पाटील यांनी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा नाद सोडला तर सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक असणारे उत्तमराव जानकर यांच्या उमेदवारीकडे लक्ष केंद्रित केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी परिवारातील सदस्यांसह अमितजी शहा यांची भेट घेतली. त्यावेळेस अमितजी शहा यांनी केंद्राकडे न संपर्क साधता महाराष्ट्रातील संबंधित देवेंद्रजी फडवणीस व भाजपच्या नेत्यांच्या भेटीचा सबुरीचा सल्ला दिल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्रजी फडवणीस यांची माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील, विश्वतेजसिंह रणजीतसिंह मोहिते पाटील आणि अन्य सदस्य यांनी भेट घेतलेली होती‌. त्याही वेळेला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नव्हता, अशी भाजपच्या गोटामध्ये चर्चा सुरू होती. तरीसुद्धा मोहिते पाटील यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू होते‌. उमेदवारी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनाच मिळणार असल्याचे संकेत मिळाल्याने मोहिते पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा नाद सोडला तर सोलापूर लोकसभेसाठी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक उत्तमराव जानकर यांनी सोलापूर लोकसभेसाठी निवडणूक लढावी यासाठी कार्यकर्त्यांकडून चाचपणी सुरू आहे. भाजपचे केंद्रीय व राज्यातील नेतृत्व व राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या संगनमताने उत्तमराव जानकर यांना लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या मार्फत सद्यपरिस्थिती जाणून घेण्याच्या सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे उत्तमराव जानकर यांचे हजारो समर्थक यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलेला होता. मोहिते पाटील यांना वाटत होते, उत्तमराव जानकर यांना उमेदवारी मिळणार नाही. परंतु, उत्तमराव जानकर यांचा भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्याकडून वाढता प्रतिसाद मिळत असल्याने उत्तमराव जानकर यांची उमेदवारी विचाराधीन न झालेली असल्याने मोहिते पाटील यांचे उत्तमराव जानकर यांच्या उमेदवारीकडे लक्ष केंद्रित केलेले आहे.

माढा लोकसभा मतदार संघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी रोखू शकण्यामध्ये अपयशी झालेले आहेत. मात्र, उत्तमराव जानकर यांना उमेदवारी न मिळण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. उत्तमराव जानकर माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील विरोधी गटाला माहीत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व मोहिते पाटील विरोधी गट एकवटलेले असून उत्तमराव जानकर यांच्या उमेदवारीवर एकमत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. उत्तमराव जानकर यांच्या उमेदवारीमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार असल्याने जिल्ह्यातील, राज्यातील व केंद्रातील नेते व कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्तमराव जानकर यांच्या नावाला सोलापूर लोकसभेसाठी पसंती मिळत आहे. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि उत्तमराव जानकर यांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात रणजीतसिंह नाईक निंबाळकर हा सिंह तर सोलापूर लोकसभा मतदार संघात उत्तमराव जानकर ढाण्या वाघ अशी सिंह आणि ढाण्या वाघाची जोडी निश्चितपणे दिल्लीला जाईल, असा विश्वास राजकीय वर्तुळासह कार्यकर्त्यांच्या मध्ये चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

3 Comments

  1. I’m just commenting to let you be aware of of the perfect experience my friend’s princess found checking your web page She realized a wide variety of issues, not to mention what it is like to have a marvelous helping nature to make many others with no trouble completely grasp certain tricky topics You undoubtedly surpassed our own desires Thanks for showing the effective, trusted, revealing as well as cool tips about your topic to Gloria

  2. precio priligy 30 mg A, Representative Western blot bands of protein expressions of MMP2, MMP9, ER TR7, О± SMA alpha smooth muscle actin, SM22О± smooth muscle protein 22О±, and RUNX2 runt related transcription factor 2 and the activity of MMP2 and MMP9 in the aortas from male wild type mice, which were either untreated or treated with 3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button