मोहोळ तालुक्यातील यावली येथे भाजपाच्या वतीने वंचितांसोबत ‘पालावरची दिवाळी’ साजरी…

मोहोळ (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार समाजातील वंचितांना भारतीय हिंदू संस्कृती, सण, समारंभात सामील करून त्यांचे जीवन अधिकाधिक प्रकाशमय करण्यासाठी यावर्षी राज्यभर भाजपाच्यावतीने असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मौजे यावली ता. मोहोळ, येथील डोंबारी वस्तीवर ‘पालावरची दिवाळी’ साजरी करण्यात आली.


याप्रसंगी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. शंकरराव वाघमारे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संजीवदादा खिलारे, भाजपा सोलापूर जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अंकुश (भैय्या) अवताडे, एम. एम. काडगावर, आनंदा पुजारी, संतोष जावळकुटी, गुंडू जाधव, मोहन अष्टूळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


भारतीय सण, समारंभ आणि उत्सवांपासून दूर राहिलेल्या भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सजग राजकीय पक्ष म्हणून भाजपा तर्फे दिपावली दिपोत्सवा दरम्यान “एक दिवा वंचितांच्या घरी” प्रत्येक पालावर लावून सर्व वंचित घटकांना हिंदू बांधव म्हणून सामावून घेण्याचा संकल्प केला आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपाच्या वतीने मोहोळ तालुक्यातील यावली येथील डोंबारी समाजाच्या पालावर दीप प्रज्वलन करून डोंबारी बांधवांना फराळ, नवीन कपडे व वस्तूंचे वाटप केले. यावेळी पालावरील परिसर स्वच्छ करण्यात आला होता. तेथील डोंबारी बांधवांसह उपस्थित कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या फराळाची पंगत आयोजित केली होती. अशा प्रकारचा वेगळा कार्यक्रम पाहिल्यामुळे तेथील लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.