मोहोळच्या सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. प्रांजली फाटे तर उपाध्यक्षपदी रेखा कांबळे यांची बिनविरोध निवड

अंकोली बारामती झटका (दशरथ रणदिवे)
मोहोळ येथील सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. प्रांजली सागर फाटे तर उपाध्यक्षपदी रेखा सूर्यकांत कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मोहोळ येथील शाहीर विश्वासराव फाटे यांनी ३४ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ही निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयातर्फे जी. टी. वडेकर यांनी काम पाहिले.
नूतन अध्यक्षा ॲड. प्रांजली सागर फाटे यांचे माहेर बिटरगांव, ता. करमाळा असून त्या सहकार्य उद्योग समूहाच्या प्रकाश सुभेदार पाटील यांच्या त्या कन्या आहेत. तर यावेळी संचालिका म्हणून संगीता नंदकुमार फाटे, ॲड. शमशाद मकबुल मुलाणी, डॉ. भारती मनोज देवकते, कीर्ती शिवराज शिंदे, स्मिता मनोज महाजन, यशोदा दिलीप कांबळे, संध्या आकाश फाटे, वैशाली अशोक भोसले व स्मिता प्रकाश कोकणे यांची निवड झाली आहे. यावेळी मोहोळ अर्बन बँकेचे संस्थापक नंदकुमार विश्वासराव फाटे, चेअरमन डॉ. सागर नंदकुमार फाटे, मॅनेजर सुधाकर शिंदे व महिला पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आभार व्यवस्थापक सिकंदर मुजावर यांनी मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.