मोरोची येथे कृषी संजीवनी पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत कृषी विभागाकडून मार्गदर्शन
मोरोची (बारामती झटका)
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने मंगळवार दि. २५ जून २०२४ रोजी सकाळी ११ वा. मौजे मोरोची ता. माळशिरस येथील मोरजाई मंदिरामध्ये कृषी संजीवनी पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत ऊस लागवड तंत्रज्ञान दिन, कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व खरीप नियोजन याविषयी कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आले.
श्री. कुलदिप ढेकळे यांनी सेंद्रिय शेती, शेतकरी गट व मकेवरील लष्करी अळी व हुमणी अळी नियंत्रण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. उदय साळुंखे कृषी पर्यवेक्षक नातेपुते यांनी महाडीबीटीमधील विविध योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री. रणजित नाळे कृषी सहाय्यक लोणंद यांनी ऊस लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मोरोची गावचे कृषी सहाय्यक श्री. विजय कर्णे यांनी QR Code द्वारे शेतकऱ्यांना योजनांची माहिती दिली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तेच श्री. डी. एम. सूळ सर यांनी कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त करून आभार मानले.
सदर कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच सौ. छाया भागवत झेंडे, उपसरपंच किशोर सूळ, कृषी मित्र सुभाष सूळ व गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Very well-written and funny! For more information, visit: DISCOVER HERE. Looking forward to everyone’s opinions!