ताज्या बातम्यासामाजिक

मोरोची येथील स्व. श्रीमती समाबाई आप्पासाहेब सुळ पाटील अनंतात विलीन…

माहेर पांगरी दडसवाडा ता. माण, सासर सुळ पाटील परिवार मोरोची तालुका माळशिरस…

मोरोची (बारामती झटका)

मोरोची ता. माळशिरस, येथील स्व. श्रीमती समाबाई आप्पासाहेब सुळ पाटील यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वार्धक्याने गुरुवार दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार होते. मोरोची गावचे माजी सरपंच शिवाजीराव सुळ पाटील व माजी उपसरपंच तानाजीराव सुळ पाटील यांच्या मातोश्री होत्या तर माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील यांच्या आजी होत्या. त्यांच्यावर शिंगणापूर पाटी नजीक मोरोची हद्दीतील राहत्या घराशेजारील शेतामध्ये अंतिम संस्कार संध्याकाळी ०८ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या तिसरा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम शनिवार दि. २४/०८/२०२४ रोजी सकाळी ७:३० वाजता होणार आहे.

समाबाई यांचा जन्म दडसवाडा पांगरी ता. मान, येथील सिद्धेश्वर दडस यांच्या परिवारामध्ये १९३२ साली झालेला होता. माळशिरस तालुक्यातील मोरोची गावचे प्रगतशील बागायतदार आप्पासाहेब सुळ पाटील यांच्याशी स्वातंत्र्यपूर्व काळात लग्न झालेले होते. प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संसाराचा कष्टातून स्वर्ग बनविलेला होता. उभयतांना श्री. शिवाजीराव व श्री. तानाजीराव दोन मुले तर सौ. इंदुमती दत्तात्रेय रुपनवर डोंबाळवाडी (कु.) ता. माळशिरस सौ. सुमन संपत अर्जुन, चिखली, ता. इंदापूर, सौ. निलावती तानाजी रुपनवर लोणंद, ता. माळशिरस अशा तीन मुली आहेत.

स्वर्गीय आप्पासाहेब यांचे दि. ०४/०४/१९८४ रोजी अर्धांग वायू मुळे दुःखद निधन झालेले होते. त्यानंतर मातृत्व आणि पितृत्व दोन्हीही जबाबदाऱ्या समाबाई यांनी सांभाळलेल्या होत्या. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ धार्मिक वृत्तीच्या होत्या. सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी मुलांचा व नातवांचा संसार करण्यामध्ये हातभार लावलेला होता. समाबाई यांच्या दुःखद निधनाने सुळ पाटील परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. सुळ पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि मृतात्म्यास शांती लाभो हीच, बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

14 Comments

  1. Real Estate naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.

  2. Имбирь — это удивительный корень, который обладает множеством полезных свойств. Он помогает укрепить иммунитет, улучшить пищеварение и справиться с простудными заболеваниями. Имбирь активно используется в кулинарии и медицине благодаря своим противовоспалительным и антибактериальным свойствам. Регулярное употребление имбиря способствует улучшению общего самочувствия и повышению жизненного тонуса.

  3. Имбирь — это удивительный корень, который обладает множеством полезных свойств. Он помогает укрепить иммунитет, улучшить пищеварение и справиться с простудными заболеваниями. Имбирь активно используется в кулинарии и медицине благодаря своим противовоспалительным и антибактериальным свойствам. Регулярное употребление имбиря способствует улучшению общего самочувствия и повышению жизненного тонуса.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button