मोटेवाडी (फोंडशिरस) येथे कृषीदूताकडुन पशुधन लसीकरण शिबिराचे आयोजन
फोंडशिरस (बारामती झटका)
फोंडशिरस येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांनी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त मोटेवाडी (फोंडशिरस) ता. माळशिरस येथे जनावर लसीकरण शिबिराचे आयोजन पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. ए. चोरमले यांच्या हस्ते दि. ०१ जुलै रोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एम. एम. चंदनकर, प्रा. डी. डी. साळुंखे , प्रा. डी. एस. मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे आयोजन आदित्य कारकले, प्रतिक बिरादार, तानाजी बिराजदार, अली शेख, अजिंक्य कांबळे, रोहित शिंदे, गणेश सुरवसे, करण जाधव या कृषिदूतांनी केले होते. या कार्यक्रमास पशु संवधक श्रीकांत वाघमोडे, सचिन काळे, सचिन ढोपे, तसेच पंचक्रोशीतील अनेक शेतकरी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Fantastic site A lot of helpful info here Im sending it to some buddies ans additionally sharing in delicious And naturally thanks on your sweat