ताज्या बातम्याराजकारण

मोठी आश्वासने दिलेले नेते व कार्यकर्ते मतदारांनी तोंडावर पाडले तेच ईव्हीएम मशीनच्या आड तोंड दडवत आहे – निवडणूक संयोजक बाळासाहेब सरगर.

महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा नैतिक विजय आहे मात्र, विरोधकांनी दहशत व बोगस मतदानाने विजय मिळवलेला आहे.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस विधानसभा 254 अनुसूचित जाती राखीव मतदार संघात 2024 च्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचा नैतिक विजय आहे मात्र, विरोधकांनी तालुक्यातील दोन शक्ती एकत्र येऊन दहशत व बोगस मतदानाने विजय मिळविलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत गावातून जास्तीत जास्त मतदान देतो, असे बैठकीत मोठ मोठे बोलून आर्थिक रसद घेऊन आलेले मोठी आश्वासने दिलेले नेते व कार्यकर्ते मतदारांनी तोंडावर पाडलेले आहेत. तेच नेते व कार्यकर्ते ईव्हीएम मशीनच्या आड तोंड दडवत आहेत, अशी मिश्किल खोचक टीका भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माळशिरस तालुका अध्यक्ष तथा माळशिरस विधानसभा संयोजक प्रमुख बाळासाहेब सरगर यांनी माळशिरस विधानसभा निवडणुकीच्या निकालावर औपचारिक चर्चा करताना सांगितले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारने शेतकऱ्यांना शेतीपंपाची मोफत वीज, जेष्ठ नागरिक यांना वयोश्री योजना, शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान अशा अनेक व्यक्तिगत व सार्वजनिक हिताचे निर्णय घेतलेले आहेत. सर्वात महत्त्वाची असणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महिलांचे जास्तीत जास्त महायुतीच्या बाजूने मतदान झालेले आहे. माळशिरस तालुक्यात एक लाख 24 हजारच्यावर महिलांना साडेसात हजार खात्यावर मिळालेल्या लाडक्या महिलांनी लाडक्या भाऊला मतदान केलेले आहे. त्यामुळे दाजींना बरोबर घेऊन सावत्र भाऊ या दोघांनी समाजामध्ये लोकशाही व निवडणूक आयोगाची चेष्टा लावलेली आहे.

माळशिरस तालुक्यात लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदाच जनता दरबार सुरू केला. जनता दरबारामध्ये अनेक लोकांची व्यक्तिगत व सार्वजनिक कामे केलेली होती. त्यावेळेस कोणत्याही व्यक्तीला जात, धर्म, गट, तट पक्ष याची विचारणा न करता समोरच्या व्यक्तीचे काम केलेले आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या 70 वर्षापासून प्रलंबित असणारे रस्ते, पूल अशी अनेक रेंगाळलेली कामे केलेली आहेत. माळशिरस तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन गट एकत्र येऊन लढत होते. त्यामुळे नेते व कार्यकर्ते यांचा मतदारावर प्रचंड दबाव, दहशत होती. बुथ एजंट यांना धमकावून बोगस मतदान झालेले आहे. तरीसुद्धा मतदारांनी एक लाख आठ हजाराच्या वर मताधिक्य महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांना दिलेले आहे. मोठे बोलून नेते तोंडावर पडलेले असल्याने ईव्हीएम मशीनच्या आड तोंड लपवत असल्याचे सध्या तालुक्यात राजकारण सुरू आहे.

निश्चितपणे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली लढविल्या जाणार आहेत. अनेकांची जिल्हा परिषद व पंचायत समितीचे स्वप्न धुळीस मिळणार असल्याने राजकीय वातावरण निर्माण व्हावे यासाठी केविलवाणा प्रयोग सुरू आहे. मात्र, आगामी निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील सुज्ञ जनता व लाडक्या बहिणी विरोधकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असा माळशिरस तालुका विधानसभा संयोजक प्रमुख बाळासाहेब सरगर यांनी ठाम विश्वास व्यक्त केला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

5 Comments

Leave a Reply

Back to top button