ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

मोठी ध्येय ठेवा, स्वप्ने ठेवा, त्याला कृतीची जोड द्या, यश तुमचेच आहे – चंद्रशेखर गायकवाड

अकलूज (बारामती झटका)

आयकॉन सायन्स अकॅडमीच्या वतीने दिः 11/1/26 रोजी 10 वाजता उज्ज्वल यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षिस समारंभ आयोजित केला होता.

यावेळी साहित्यीक व व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड व्याख्यान देताना म्हणाले, आयकॉन सायन्स ॲकॅडमीचे संचालक मा. श्री. एल. डि. बाबर सर यांनी 37 वर्षे अध्यापनाला वाहून घेऊन आपले जीवन विद्याध्यासाठी वाहून घेतले आहे. अकलून मधील 90% डॉक्टर्स आणि इंजिनीअर प्रा. बाबर सरांचे विद्यार्थी आहेत. अकलूजच्या भूमीत लातुर, कोठा सारखी प्रगत सायन्स अकॅडमी उभारणी
करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविणारी त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देऊन यशाच्या शिखरावर घेऊन जाणारी आयकॉन सायन्स ॲकॅडमीने आजपर्यंत शेकडो विद्यार्थी घडविले आहेत. विश्वास तुमचा, कष्ट आमचे यश फक्त तुमचेच, या ब्रिदवाक्याला अनुसरून संचालक गुरुवर्य प्रा. बाबर सर, प्रा. काळे सर, प्रा. वाघमोडे सर‌ यांनी आपले जीवन विद्यार्थ्यांसाठी वाहून घेतले आहे. 2021 मधील या रोपट्याचे आज वटवृक्षांत रुपांतर झाले आहे. आदरणीय बाबर बाबर सरांचा मी विद्यार्थी आहे, याचा मला अभिमान आहे.

यावेळी प्रा.ज्ञकदम सर, प्रा. लवटे मॅडम, प्रा. तलवार मॅडम, साहित्यीक अनिरुद्ध शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी बहुसंख्य विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. काळे सर यांनी केले तर आभार प्रा. वाघमोडे सर यांनी मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom