Uncategorizedताज्या बातम्या

माऊलींचे आळंदीतून ११ जून रोजी होणार प्रस्थान

आळंदी (बारामती झटका)

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आळंदीतून रविवार दि. ११/६/२०२३ रोजी प्रस्थान होणार आहे‌. सोमवार दि. १२/६/२०२३ रोजी आळंदी ते पुणे असा २९ किमी प्रवास असणार आहे. मंगळवार दि. १३/६/२०२३ रोजी पुणे येथे मुक्काम होणार आहे. बुधवार दि. १४/६/२०२३ रोजी पुणे ते सासवड असा ३२ किमी प्रवास असून गुरुवार दि. १५/६/२०२३ रोजी सासवड येथे मुक्काम असणार आहे. शुक्रवार दि. १६/६/२०२३ रोजी सासवड ते जेजुरी असा १६ किमी. प्रवास असून शनिवार दि. १७/६/२०२३ रोजी जेजुरी ते वाल्हे असा १२ किमी. प्रवास असणार आहे. रविवार दि. १८/६/२०२३ रोजी वाल्हे ते लोणंद असा २० किमी प्रवास असणार आहे. सोमवार दि. २८/६/२०२३ रोजी लोणंद येथे मुक्काम असणार आहे.

मंगळवार दि. २०/६/२०२३ रोजी तरडगाव ते फलटण असा ८ किमी प्रवास असणार आहे. बुधवार दि. २१/६/२०२३ रोजी तरडगाव ते फलटण असा २१ किमी चा प्रवास असणार आहे. गुरुवार दि. २२/६/२०२३ रोजी फलटण ते बरड असा १८ किमी. प्रवास असणार आहे शुक्रवार दि. २३/६/२०२३ रोजी बरड ते नातेपुते असा २१ किमी प्रवास असणार आहे. शनिवार दि. २४/६/२०१३ रोजी नातेपुते ते माळशिरस असा १८ किमी प्रवास असणार आहे. रविवार दि. २५/६/२०२३ रोजी माळशिरस ते वेळापूर असा १९ किमी प्रवास असणार आहे. सोमवार दि. २६/६/२०२३ रोजी वेळापूर ते भंडीशेगाव असा २१ किमी प्रवास असणार आहे. मंगळवार दि. २७/६/२०२३ रोजी भंडीशेगाव ते वाखरी असा १० किमी प्रवास असणार आहे. बुधवार दि. २८/६/२०२३ रोजी वाखरी ते पंढरपूर असा ५ किमी प्रवास असणार आहे. गुरुवार दि. २९/६/२०२३ रोजी माऊलींची पालखी आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये असणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button