प्राची लटकेच्या क्रिडा क्षेत्रातील कामगिरीमुळे संत गाडगेबाबा विद्यालयाचा नावलौकिक उंचावला – केंद्रप्रमुख रोहिदास कापसे
माढा (बारामती झटका)
ग्रामीण भागातील एक होतकरू खेळाडू प्राची दत्तात्रय लटके हिने भरपूर सराव, जिद्द, चिकाटी आणि क्रिडा शिक्षकांच्या अचूक मार्गदर्शनाच्या जोरावर जिल्हास्तरीय गोळा फेक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असून यामुळे श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयाचा नावलौकिक नक्कीच उंचावला असल्याचे गौरवोद्गार मानेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रोहिदास कापसे यांनी काढले आहेत.


ते कापसेवाडी-हटकरवाडी ता. माढा येथे ग्रामस्थ व विद्यालयाच्या वतीने गुणवंतांच्या सत्काराप्रसंगी बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजेंद्र खोत होते.
यावेळी राज्यस्तरीय गोळा फेक स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल प्राची दत्तात्रय लटके हिचा व विद्यालयाचा तसेच माजी विद्यार्थी रोशन पवार यास राज्यस्तरीय वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल व क्रिडा शिक्षक सचिन क्षीरसागर यांचा ग्रामस्थांच्या वतीने चेअरमन वैजिनाथ व्हळगळ व सरपंच राजेंद्र खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यावेळी माजी सरपंच तथा चेअरमन शिवशंकर गवळी, उद्योजक मुकुंद गवळी, चेअरमन वैजिनाथ व्हळगळ, प्रभारी मुख्याध्यापक प्रविण लटके, पोलिस पाटील रामकृष्ण धावणे, अनंता बगडे, तुकाराम कापसे, मुख्याध्यापक आण्णासाहेब पाटील, प्रसन्न दिवाणजी, तनुजा तांबोळी, शिवाजी भोगे, सचिन क्षीरसागर, सुधीर टोणगे, श्रीरंग बगडे, मारुती लटके, पांडुरंग बोबडे, दत्तात्रय लटके, बालाजी लटके, लहू गवळी, सागर राजगुरू, रामा गवळी, सुरज गवळी यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार सहशिक्षक सुनील खोत यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
