मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या परिचारक कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीत रणजीतसिंह मोहिते पाटील पडले एकाकी…

पंढरपूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते. पंढरपूर येथील दौऱ्यावर असताना श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन शासकीय विश्रामगृह येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आराखड्याची बैठक संपवून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील स्वर्गीय प्रभाकर परिचारक यांचे काही दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने दुःखद निधन झालेले होते. त्यासाठी परिचारक यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची सांत्वन पर भेट मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली. त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पंढरपूर मंगळवेढा विधान मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, सांगोला विधानसभेचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर एका बाजूला बसलेले होते तर, दुसऱ्या बाजूला विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील बसलेले होते.
एका बाजूला एकोप्याने बसलेले होते तर दुसऱ्या बाजूला आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील एकाकी पडलेले फोटो वरून दिसत आहेत. त्यांच्या बाजूला जागा असताना सुद्धा कोणताही आमदार तिथे बसलेला नाही, याची राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.