Uncategorizedताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे शिष्ट मंडळ भेट घेणार…

साखर संचालक, प्रशासन डॉ. संजयकुमार भोसले यांच्या पत्राला श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालकांनी दाखवली केराची टोपली….

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांना भेटून थकीत कर्मचारी व शेतकरी व्यथा मांडणार….

सदाशिवनगर (बारामती झटका)

साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य साखर संकुल यांच्याकडून श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांना साखर संचालक, प्रशासन डॉ. संजयकुमार भोसले यांच्याकडून पत्र आले आहे. यामध्ये कामगारांचा थकीत पगार व ग्रॅज्युटी रक्कम हा विषय संबंधीत कारखाना स्तरावरील आहे. थकीत वेतन ग्रॅज्युटी, वाढीचा फरक आणि उपदान मिळणेबाबत श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर नियमानुसार अदा करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करून अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा, असे पत्र दि. ०८/११/२०२३ दिलेले होते. साखर संचालक प्रशासन डॉ. संजय कुमार भोसले यांच्या पत्राला श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालकांनी केराची टोपली दाखवलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांची भेट घेऊन थकीत कर्मचारी व शेतकरी व्यथा मांडणार असल्याचे कामगारांमधून बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या थकीत कामगार व शेतकऱ्यांची देणी देण्याकरता 113 कोटी रुपये मंजूर केलेले होते. मात्र, कारखान्याचे चेअरमन भारतीय जनता पक्षाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आहेत. भाजपच्या विचाराचे सरकार असल्याने सहकार मंत्री व साखर आयुक्त यांची दिशाभूल करण्याचा धक्कादायक प्रकार केलेला असल्याचे संतप्त सेवानिवृत्त कामगारांमधून बोलले जात आहे.

हकीकत अशी कि, श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सदाशिवनगर या कारखान्याला केंद्र सरकारची एनसीडीसी नवी दिल्लीकडून ११३ कोटी ४२ लाख रुपये रक्कम दि. १/९/२०२३ रोजी कारखान्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. या कर्जाला थक हमी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. यापैकी १७ कोटी ५० लाख रुपये आजी-माजी कर्मचाऱ्यांचे पगार व थकीत वेतन दि. ३०/९/२०२२ पर्यंत साठी दिले होते. १७ कोटी ५० लाख रुपयांपैकी आजी-माजी कर्मचाऱ्यांना अंदाजे १ कोटी ५० लाख रुपये फक्त वाटलेले आहेत. निवेदनावर सह्या केलेल्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्या पैशांपैकी एक रुपयाही मिळाला नाही. दोन महिन्यांपासून कारखान्याचे कार्यकारी संचालकांकडे मागणी केली आहे. तरी मागील दोन महिन्यात त्यांना तुम्ही पैसे देऊन आम्हाला एक रुपयाही देण्यात आला नाही.

साखर आयुक्तांकडे जबाबदारी दिली होती. शासनाने त्या-त्या हेडला पैसे दिले होते. व कर्मचाऱ्यांसाठी १७ कोटी ५० लाख रुपये दिले होते. पण, कारखाना ते पैसे आम्हाला देण्यासाठी तयार नाही. इतर ठिकाणी खर्च करणार आणि तुम्हाला ११३ कोटी ४२ लाख रुपयांचा पूर्ण हिशोब देणार. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी ३० ते ३५ वर्ष या कारखान्यामध्ये सेवा केली आहे. आमच्यावर सतत अन्याय होत आहे. आता या वृद्धावस्थेमध्ये कारखान्याकडे सतत हेलपाटे व वादविवाद घालण्याची आमची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना सह्या असलेल्या सर्वजणांची रक्कम कोर्टाच्या आदेशानुसार व्याजासह एक रकमी देण्याचे आदेश पारित करावे नाहीतर कार्यकारी संचालकांवर कारवाई किंवा निलंबित करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन देण्यात आलेले होते.

भाजपचे नेते कष्टकरी व गोरगरीब कामगारांचे आधारवड देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपत आलेले आहे. त्यामुळे लवकरच देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या सहकार्याने आमचा प्रश्न लवकरच मिटेल असा आशावाद सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांमधून बोलले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button