मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आढावा बैठकीत अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे यांच्या कार्याचे कौतुक केले…

पुणे (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री रवींद्रजी चव्हाण, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीची पश्चिम महाराष्ट्रातील पुणे येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आढावा बैठक संपन्न झाली. सदरच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाचे अकलूज शहराध्यक्ष महादेवरावजी कावळे यांच्या कार्याचे कौतुक केले.
पुणे येथे झालेल्या आढावा बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखरजी बावनकुळे, ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, ना. जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना . शिवेंद्रसिंहराजे भोसले, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आ. राम सातपुते यांच्यासह आजी माजी मंत्री व आजी-माजी खासदार, आमदार यांच्यासह सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, माळशिरस तालुका माजी अध्यक्ष व विद्यमान सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव काटकर, माळशिरस तालुका अध्यक्ष ॲड. शरदजी मदने, नातेपुते मंडल अध्यक्ष संजयजी देशमुख, माळशिरस मंडल अध्यक्ष तथा पिलीव गावचे लोकप्रिय सरपंच नितीनजी मोहिते, अकलूज मंडल अध्यक्ष सुजय माने, तालुका प्रभारी डॉ. निलेशजी ननवरे, अकलूज शहर अध्यक्ष महादेवरावजी कावळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्रातील आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आढावा बैठकीमध्ये प्रत्येक तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आढावा सांगितला. त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा आढावा भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी सविस्तर आढावा सांगितला..
माळशिरस तालुका प्रभारी श्री. निलेशजी ननवरे यांनी अकलूज नगर परिषदेचा आढावा सांगून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज शहराध्यक्ष महादेवरावजी कावळे यांनी अकलूज शहरातील 341 महिलांना विमानाने बालाजी दर्शन घडवून आणल्याचे सांगितले. त्यावेळेस लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडक्या बहिणीसाठी केलेल्या कार्याचे कौतुक करून बालाजी निश्चितपणे आपल्या केलेल्या कार्याची दखल घेईल, अशा पद्धतीने आढावा बैठकीत महादेवरावजी कावळे यांच्या कार्याचे कौतुक केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



