मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मोहिते पाटील यांच्या कारखाना पतसंस्था व मार्केट कमिटीच्या चौकशीचे दिले आदेश…..

माळशिरस तालुक्यातील शेतकरी, सभासद, कामगार, खातेदार, ठेवीदार, कर्जदार, व्यापारी व गाळेधारक शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांना भेटले…..
सदाशिवनगर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माळशिरस तालुक्यातील शेतकरी, सभासद, कामगार, खातेदार, ठेवेदार, कर्जदार, व्यापारी व गाळेधारक शिष्टमंडळ यांनी मुंबई येथील वर्षा बंगल्यावर भेट घेऊन श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर, सुमित्रा पतसंस्था अकलूज, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज, संस्थेच्या सखोल चौकशी करून न्याय देण्यासाठी आपण लक्ष देण्याचे गरज असल्याचे सांगितले. शेतकरी, सभासद, कामगार, खातेदार, ठेवीदार, कर्जदार, व्यापारी व गाळेधारक यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका नातेपुते मंडल उपाध्यक्ष श्री. हरी विठ्ठल पालवे यांनी दिलेल्या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वाक्षरी करून चौकशीचे आदेश दिलेले आहेत…

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर चेअरमन आमदार रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील, सुमित्रा पतसंस्था तत्कालीन चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील, कारखाना पतसंस्था व मार्केट कमिटी मोहिते पाटील यांच्या संस्थांची चौकशी लागल्याने सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे…
सर्व पिडीतांनी मिळून दिलेल्या पत्रामध्ये

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर, ता. माळशिरस या कारखान्याच्या विरोधात दिलेल्या तक्रारी अर्ज मध्ये…
विषय :- श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांवरती केलेल्या अन्यायाविरुद्ध चौकशी करून त्यांना न्याय देणे बाबत…
महोदय,
वरील विषयास अनुसरून श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना गेली कित्येक वर्ष कारखान्याचे चेअरमन रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी अन्याय करून कर्मचाऱ्यांची व शेतकऱ्यांची प्रपंच उध्वस्त केले असून आपण मंजूर केलेल्या एनसीडीसीकडून 113 कोटी कर्जातील शेतकऱ्यांचे व शेतकरी ऊस उत्पादक यांचे देणे देण्यासाठी पैसे देण्यात आले. परंतु कर्मचाऱ्यांना त्यातील एक रुपयाही दिला नाही. मागील सहा वर्षांपासून कर्मचाऱ्यांचा प्रायव्हेट फंड भरलेला नाही. सीजन 2025 ते 2016 मधील 16 महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना दिला नाही. प्रशासक कालावधीतील डिसेंबर 2016 ते 2018 या वर्षाचा कर्मचाऱ्यांना पगार दिला नाही. जानेवारी 2019 ते 2021 चेअरमन रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या काळात कर्मचाऱ्यांना फक्त 25% पगार दिला असून अद्यापही उर्वरित 75 टक्के पगार दिलेला नाही. चेअरमन रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या काळात लिऑफ एक वर्ष पगार दिला नाही. सीजन 2025 ते 2016 पासून रिटायर कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी अद्याप दिलेली नाही तरी चेअरमन रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी कर्मचारी व शेतकरी यांच्या वरती केलेल्या अन्यायाविरोधात न्याय देण्यासाठी संबंध देताना आदेश व्हावेत अशा प्रकारे पत्रव्यवहार केलेला आहे…

सुमित्रा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था अकलूज ता माळशिरस या पतसंस्थेच्या विरोधात दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये
विषय :- माळशिरस तालुक्यातील सुमित्रा ग्रामीण बिगर शेती या पतसंस्थेमध्ये आर्थिक घोटाळ्याची मालिका सुरू असून बोगस कर्ज प्रकरणे दाखवून सामान्य शेतकरी व नागरिकांकडून जबरदस्तीने सुरू असलेल्या वसुलीची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून तत्कालीन चेअरमन जयसिंह शंकर मोहिते पाटील यांची चौकशी होणे बाबत…
महोदय,
वरील विषयास अनुसरून माळशिरस तालुक्यातील सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्याची खालील मुद्द्यावरती उच्चस्तरीय चौकशी नेमून कारवाई करणे बाबत.
मागील दहा वर्षात जवळपास हजार हून अधिक कर्जाची प्रकरणे अधिकार्यांशी संगणमत करून वसुली दाखला मिळवण्यात आले व यातून 50 ते 60 कोटी होऊन अधिकची सक्तीची वसुली बेकायदेशीरपणे करण्यात आली..
अनेक प्रकरणात तर वसुली संदर्भात घेतल्या जाणाऱ्या सुनावण्यांमध्ये अनेक वर्षाचे अंतर दिसून येत आहे.
बेकायदा वसुली करून यातून शेकडो कोटी रुपये संस्थेचे चेअरमन व संचालकांनी हडप केले आहेत.
यापूर्वी सहकार विभागामार्फत चौकशी होऊन तत्कालीन चेअरमन वर गुन्हा दाखल झाला व चेअरमनच्या दबावात येऊन तत्कालीन मॅनेजर दिनकर भोसले यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये आत्महत्या केली.
अजूनही शेकडो कर्ज प्रकरणाचे शासकीय अधिकाऱ्यांशी संगणमत करून आणि दबाव टाकून वसुली दाखले मिळवले जात आहे..
तरी याची उच्चस्तरीय चौकशी करून सुमित्रा पतसंस्थेचे सहकार विभागाने दिलेले सर्व वसुली दाखले रद्द करण्याचे आदेश देऊन आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून तत्कालीन चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचेवरती कारवाई करण्यात यावी, ही विनंती तक्रारी अर्ज दिलेला आहे…

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज ता माळशिरस या मार्केट कमिटीच्या तक्रारी अर्जामध्ये
विषय :- माळशिरस तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज येथील आर्थिक घोटाळ्याची व अनियमित कारभाराची चौकशी करून प्रशासक नियुक्ती करणेबाबत…
महोदय,
वरील विषयास अनुसरून माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांची हक्काची अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी संस्था कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज वर वर्षानुवर्षे एकाच परिवाराची सत्ता आहे. सदर बाजार समितीचे सचिव व संचालकांबद्दल अनेक भ्रष्टाचाराच्या तक्रारी असून सचिव राजेंद्र काकडे यांच्या निवृत्तीनंतरही बेकायदेशीररित्या नेमणूक करण्यात आलेली आहे. सचिव काकडे यांची सचिव पदावरील मूळ नियुक्ती देखील बेकायदेशीर असून त्यास पणन संचालक यांची मंजुरी घेतली नव्हती. बाजार समितीकडे उत्पन्नाचे अनेक स्तोत्र व संधी असतानाही मूळ बाजार व उपबाजार नातेपुते येथे पायाभूत सुविधांचा विकास केलेला नाही. बाजार समितीमध्ये संचालक मंडळाच्या जवळपास जवळच्या 36 लोकांना रोजंदारीवर नेमले असून त्यांचेवर लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. ज्यामुळे बाजार समितीच्या नफ्यात वाढ होत नाही. बाजार समितीच्या अकलूज बाजारपेठेतील 292 गाडी व नातेपुते येथील 156 गाडे यांचे करारनामे बाजार समितीने केलेले नाहीत. यातून बाजार समितीला कोट्यावधीचे नुकसान झालेले आहे. सभापती सचिव यांनी यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे.
तरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील दहा वर्षात केलेल्या सर्व कामांची चौकशी करून प्रशासक नियुक्ती करण्यात यावी ही विनंती.
अशा पद्धतीने मार्केट कमिटीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे…
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत शेतकरी, सभासद, कामगार, खातेदार, ठेवीदार, कर्जदार, व्यापारी व गाळेधारक यांची सकारात्मक चर्चा होऊन न्याय मिळणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. मोहिते पाटील परिवार कायम सत्तेत व सत्तेत असणाऱ्या राजकीय नेत्यांची लागेबंधे असल्याने तालुक्यातील पीडितांना न्याय मिळालेला नव्हता. देवाभाऊ यांच्या रूपाने न्याय मिळणार असल्याने चौकशीच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



