मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नजरेतून आ. रणजीतसिंह मोहिते पाटील उतरले…

एकाही भाजपा आमदार व नेत्याने नाही दिल्या समाजमाध्यमावर शुभेच्छा ..
आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसादिवशी पक्ष विरोधी भूमिका, कुटील रणनीती, राजनीतीच्या उलट्या गिनतीला सुरुवात झाली…
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आमदार देवयानी फरांदे व आमदार राजेश पाडवी यांना 05 मे रोजी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मात्र, विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांचाही वाढदिवस 5 मे रोजी असूनसुद्धा शुभेच्छा दिल्या नाहीत. विधिमंडळातील दोन सदस्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अनेक आमदार खासदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मात्र, आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांना शुभेच्छा देण्याचे जाणीवपूर्वक टाळलेले असल्याने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नजरेतून आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील उतरले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या भाजप पक्ष विरोधी भूमिका कुटिल रणनीती राजनीतीच्या उलट्या गिनतीला सुरुवात झाली असल्याचेही वरिष्ठ राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.
भारतीय जनता पक्षाने रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेची आमदारकी दिलेली होती मात्र, लोकसभेला भाजपचे उमेदवार पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व विधानसभेला भाजपचे उमेदवार लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विरोधात निवडणुकीत काम करून भाजप पक्षाच्या विरोधी भूमिका घेतलेली होती असा आरोप भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांनी घेतलेला होता. लोकसभेच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सोलापूर येथील सभेला उपस्थित नव्हते. व विधानसभेच्या वेळी अकलूज येथील केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या सभेला जाणीवपूर्वक अनुपस्थित होते. परिवारातील सदस्य उघड उघड राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ फिरत होते.

भाजपने श्री शंकर सहकारी साखर कारखान्याला आर्थिक सहकार्य केलेले असताना सुद्धा कारखान्याचे कर्मचारी व कार्यकर्ते भाजपच्या विरोधात प्रचार करीत होते, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा माहिती मिळालेली होती. माळशिरस तालुका भाजप सदस्यता अभियानात सहभागी न होता कर्मचारी इतर पक्षातील कार्यकर्ते यांना भाजपचे सदस्य करून भाजपच्या कार्यालयाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्राचे भांडवल करून भाजपवर पुतना मावशीचे प्रेम वरिष्ठांनी पाहिलेले आहे.
वाढदिवसाला रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते. सदरच्या बॅनरवर शरदचंद्रजी पवार यांचे फोटो सोशल मीडियावर वायरल झालेले होते. वाढदिवसाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी फेसबुक अथवा ट्विटरवर शुभेच्छा देण्याचे टाळलेले असल्याने भाजप पक्षविरोधी भूमिका कुटिल रणनीती राजनीतीच्या उलट्या गिनतीला सुरुवात झालेली असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे.
भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नही, याचा प्रत्यय देवाभाऊ यांच्या मनातून उतरलेल्या व्यक्तीचे आता काय खरं नाही, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. पक्षाशी बेईमानी केलेला पापाचा घडा भरलेला आहे. निश्चितपणे लवकरच पक्षविरोधी कारवाईला सुरुवात होईल, अशी राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.