मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी केला इशारा जाता जाता…

भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील मित्र परिवार व कार्यकर्त्यांना पुतना मावशीचे प्रेम उत्पन्न झाले…
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या मित्र परिवाराने मंगळवार दि. 22/07/2025 रोजी सकाळी 10 ते 05 या वेळेत विजय चौक, अकलूज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निष्ठावान भाजपच्या कार्यकर्त्यांमधून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची रणजीतसिंह मोहिते पाटील यांना वाढदिवसाला आठवण येण्याचे खरे कारण पुढच्या वाढदिवसापर्यंत रणजीतसिंह मोहिते पाटील यांची आमदारकी राहत नाही. आमदारकीची मुदत काही महिन्यावर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा निष्ठावान कार्यकर्ता असल्याचा इशारा जाता जाता केला असल्याची राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजलेली असून उलटसुलट चर्चेला उधाण आलेले आहे. भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील मित्र परिवार व कार्यकर्त्यांना पुतना मावशीचे प्रेम उत्पन्न का ? झाले अशी खुमासदार चर्चा सुरू आहे.
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे निवडणुकीत काम न करता विरोधी गटाच्या उमेदवारांचे काम केले असल्याचा ठपका भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांनी ठेवलेला होता. अनेकवेळा समाज माध्यमातून आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करावी अशी जोरदार मागणी होत होती. मात्र, रणजीतसिंह मोहिते पाटील विधान परिषदेचे आमदार असल्याने तांत्रिक अडचणी असल्याने राज्याकडून केंद्राकडे सबळ पुराव्यासह प्रस्ताव पाठवलेला केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार आहेत.

विधानसभेच्या वेळी रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची जाहीर सभा अकलूज येथील विजय चौकात होती. त्याच वेळी भाजपने दिलेल्या श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक सहकार्यावर कारखाना सुरू करून साखरेचा नैवेद्य घेऊन त्याच दिवशी रणजीतसिंह मोहिते पाटील कार्यकर्त्यांसमवेत शिंगणापूरला गेलेले होते.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील माळशिरस तालुक्यामध्ये कोणत्याही भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहत नाहीत. मात्र, पुणे, मुंबई येथे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील कॅबिनेट व राज्यमंत्री यांच्या समवेत राहून भारतीय जनता पक्षावर असणारे बेगडी प्रेम दाखवत आहेत, याची खात्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना झालेली आहे. त्यामुळेच आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाला जाणीवपूर्वक देवेंद्रजी फडणवीस यांनी शुभेच्छा न देता अन्य आमदारांना दिलेल्या महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेल्या आहेत.
भारतीय जनता पक्षात रणजीतसिंह मोहिते पाटील यांना जाणीवपूर्वक कार्यक्रमांमधून वगळले जात आहे. सोलापूरच्या विमान सेवा उद्घाटनप्रसंगी सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राने पाहिलेले आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकांची प्रभाग रचना सुरू आहे. भाजपच्या व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालेले आहे. रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन भारतीय जनता पक्षामधील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम रणजीतसिंह मोहिते पाटील मित्र परिवार व कार्यकर्त्यांमधून सुरू असल्याची निष्ठावान भाजपच्या कार्यकर्त्यांना कल्पना आहे. त्यामुळे केंद्रीय व राज्यातील नेतृत्व अशा गोष्टींकडे डोळे झाक करतील यात तीळमात्र शंका नाही. मात्र, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांना पुतना मावशीचे प्रेम उत्पन्न झालेल्याची खुमासदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



