ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा शनिवार दि. 29 मार्च 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौरा जाहीर..

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा शनिवार दि. 29 मार्च 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौरा जाहीर झालेला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुंबई येथील निवासस्थानावरून सकाळी 9.00 वाजता शासकीय मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ सांताक्रुज मुंबईकडे प्रयाण करून विमानाने सोलापूरकडे प्रयाण करणार आहेत. सोलापूर येथे विमानतळावर आगमन होऊन हेलिकॉप्टरने तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे प्रयाण होणार आहे. तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन तुळजाभवानी विकास आराखडा बैठक आटोपून हेलिकॉप्टरने पंढरपूर येथील जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका हेलिपॅड पंढरपूर येथे आगमन होऊन शासकीय मोटारीने विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे प्रयाण करतील.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथील दर्शन घेऊन शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी यांच्या समवेत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादरीकरण करून मोटारीने माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी आगमन, मोटारीने पंढरपूर हेलिपॅड वरून हेलिकॉप्टरने नरसिंहपुर, ता. इंदापूर येथे आगमन होऊन मोटारीने श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर येथे आगमन व राखीव मोटारीने पोलीस स्टेशन नरसिंहपुरकडे प्रयाण करून हेलिकॉप्टरने बारामती विमानतळ जि. पुणे येथे प्रयाण करणार आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button