ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मा. आ. राम सातपुते यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश…

राम सातपुते यांचं काम बोलतंय, माळशिरस तालुक्यात येळीव येथे शेती महामंडळ जागेवर एमआयडीसी मंजूर….

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे तत्कालीन दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस मतदार संघामध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत एमआयडीसी मंजूर होणे बाबत दि. 06/02/2023 रोजी समक्ष भेटून पत्र दिलेले होते. सदरच्या पत्रावर, माझा माळशिरस मतदारसंघ प्रगतशील असून तालुक्यातील बहुसंख्य तरुण सुशिक्षित आहेत. तरुणांच्या हाताला काम नाही त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. तसेच माझ्या मतदार संघातून पाच राष्ट्रीय महामार्ग गेले असून शेती महामंडळाचे खंडकरी शेतकऱ्यांना विभागून हजारो एकर क्षेत्र शिल्लक आहे. तसेच तालुक्यात बऱ्याच भागात पडीक व मोकळी जमीन आहे. तसेच तालुक्यात रेल्वे मार्गही मंजूर झाला असल्याने येत्या काळामध्ये आयात, निर्यात व मालवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होईल. महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत एमआयडीसी झाल्यास तरुणांना रोजगार निर्मिती होईल व बेरोजगारीचा प्रश्न मिटेल. तरी माझ्या माळशिरस मतदारसंघात तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी व विकासासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत एमआयडीसी मंजूर व्हावी असे पत्र दिलेले होते.

सदरच्या पत्रावर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग मंत्रालयाकडे कार्यवाहीसाठी पाठवलेले होते.

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर दि. 10/02/2025 रोजी पुन्हा पत्रव्यवहार करून माळशिरस मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत एमआयडीसी मंजुरीसाठी पुन्हा लक्ष वेधलेले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी उद्योजकांना प्रस्ताव मागितलेले आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यात एमआयडीसीचे स्वप्न लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांच्यामुळे पूर्ण झालेले आहे. राम सातपुते यांचे काम बोलतंय, माळशिरस तालुक्यात येळीव येथे एमआयडीसी मंजूर झालेली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सततच्या पाठपुराव्याने लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी विशेष प्रयत्न करून एमआयडीसी मंजूर केलेली आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधी नेहमीप्रमाणे मुल कोणाचं असेना, बारसे आपणच घालायचे, असा प्रकार सोशल मीडियावर सुरू आहे.

खऱ्या अर्थाने एमआयडीसी आजपर्यंत तालुक्यामध्ये का झाली नाही ?, माळशिरस तालुक्यात नव्हे तर सोलापूर जिल्ह्यासह राज्याला माहिती आहे. असे असताना शेजाऱ्याच्या लग्नात सूनेचे लाड, असाही प्रकार सोशल मीडियावर सध्या सुरू आहे. एमआयडीसीच खरं श्रेय लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांचेच आहे. असे उद्योजक, व्यापारी व सुशिक्षित तरुण वर्गामध्ये चर्चा सुरू झालेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button