मुक्त विद्यापीठ विभागीय सल्लागार समितीची बैठक संपन्न
पुणे (बारामती झटका)
पुणे येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या विभागीय केंद्राच्या सल्लागार समितीची बैठक सोमवार दि. 8 जुलै 2024 रोजी संपन्न झाली. सदर बैठकीस पुणे विभागीय केंद्राचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड तसेच सल्लागार समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख, प्राचार्य डॉ. शिवराज कुकाले, विभागीय केंद्रातील वरिष्ठ अधिकारी श्री. उत्तम जाधव व श्री. वामन आदी उपस्थित होते. सदर बैठकीत पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील विविध केंद्रामधून घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षा 2024 चा आढावा घेण्यात आला. परीक्षा पद्धतीमध्ये तसेच पेपर तपासणी संदर्भात कोणकोणत्या अडचणी आहेत व त्यात कोणकोणत्या सुधारणा करता येतील याबाबत सविस्तर चर्चा झाली.
बालेवाडी परिसरात पुणे विभागीय केंद्राचे नवीन इमारत बांधकाम तसेच ऑनलाईन शिक्षणासाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत स्टुडिओ इमारत बांधकाम आणि बारामती येथे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या उपकेंद्राच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश वाढीसाठी तसेच प्रवेश प्रक्रिया सुलभ होण्यासाठी कोणकोणत्या उपायोजना करता येतील, याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. 2024-25 च्या प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, दुहेरी पदवी इत्यादी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका उपलब्ध होणे व प्रवेश प्रक्रिया सुलभ होण्यासाठी तयार केलेल्या क्यू आर कोड ची सविस्तर माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली.
क्यू आर कोडमुळे विद्यार्थ्यांना घरी बसून आपल्या मोबाईलवर माहिती पुस्तिका पाहता येईल, तसेच घरी बसून आपल्या मोबाईल द्वारे क्यू आर कोडच्या साह्याने ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेता येईल, अशी माहिती यावेळी संचालकांनी दिली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत ड्युअल डिग्री प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठाच्या पदवी बरोबरच मुक्त विद्यापीठाची पदवी एकाच वेळी घेता येईल.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
you are truly a just right webmaster The site loading speed is incredible It kind of feels that youre doing any distinctive trick In addition The contents are masterwork you have done a great activity in this matter