मुलगी झाली हो! आनंदनगर येथील गायकवाड परिवाराने केले ‘ति’चे जंगी स्वागत…
आनंदनगर (बारामती झटका)
पहिली बेटी, धनाची पेटी, दुसरी बेटी, तूप रोटी! या विचारांचा पुरस्कार करत स्त्री जन्माचे आनंद आणि उल्हासाने स्वागत करण्याचा संस्कार आनंदनगर, अकलूज, ता. माळशिरस, येथील गायकवाड परिवाराने जोपासला. एकीकडे समाजामध्ये मुलींचा जन्मदर घटत असताना, ग्रामीण भागामध्ये मुलगी जन्माला आल्यावर तिचे लाडात जंगी स्वागत करण्याचा आनंददायी व समाजाने आदर्श घ्यावा, असे उदाहरण आनंदनगर येथील डॉ. हर्षवर्धन गायकवाड व गायकवाड परिवाराने आपल्या कृतीतून प्रस्तुत केले आहे. डॉ. गायकवाड यांना या आधी पहिले अपत्य म्हणून मुलगी त्यांच्या आयुष्यात आली. तिचेही गायकवाड परिवाराने आनंदाने जंगी स्वागत केले. आता दुसरी मुलगी गायकवाड पती-पत्नीच्या आयुष्यात आल्याने त्यांनी आनंदाने व सकारात्मकतेने या कन्येचे देखील स्वागत करून समाजापुढे आदर्श घालून दिला आहे.
माळशिरस तालुक्यातील आनंदनगर गावचे गायकवाड कुटूंब, समाजातील मातब्बर व प्रतिष्ठित असलेल्या डॉ. हर्षवर्धन वसंतराव गायकवाड व सौ. शीतल गायकवाड (तहसीलदार) यांना पहिली मुलगी आहे व दुसरी मुलगी अलीकडे त्यांच्या आयुष्यात आली. गायकवाड कुटुंब हे उच्चशिक्षित असून या घरात एकूण 33 सदस्य आहेत. त्यापैकी 11 डॉक्टर्स आहेत व मुलीच्या रूपाने आता 34 सदस्य झाले. गायकवाड परिवार हा आजच्या न्यूक्लिअर फॅमिलीच्या काळातही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतो.
पहिल्या मुलीनंतर दुसऱ्या मुलीच्या आगमनाने नाराज न होता या कुटुंबातील सदस्यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला. आपल्या आनंदात गावाला व समाजाला सहभागी करत त्यांनी गावामध्ये वृक्ष लागवड केली, तसेच गायकवाड परिवाराने मुलीच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी शेकडो लोकांना अन्नदान केले व गावातील आर्थिक दुर्बल कुटूंबातील 10 मुलींचे शैक्षणिक पालकत्व घेत त्यांचे 10 वी पर्यंतच्या सर्व शालेय वस्तू देण्याचा व शैक्षणिक जबाबदारी उचलण्याचा या कुटूंबाने निश्चय केला आहे.
मुलगा-मुलगी एकसमान, करूया भारत देश महान! या विचारांचा पुरस्कार करत,
“व्हावी तू आभाळाहून मोठी ,
लेक होऊन जन्मोजन्मी, यावी माझ्याच पोटी.”
स्त्री आणि पुरूष यात कोणताही भेद करू नका, मुलगी हीच आपल्या घरातील लक्ष्मी आहे, हा संदेश गायकवाड परिवाराने देऊन समाजामध्ये अनुकरणीय आदर्श प्रस्थापित केला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Usually I do not read article on blogs however I would like to say that this writeup very compelled me to take a look at and do it Your writing style has been amazed me Thank you very nice article