मूलनिवासी सभ्यता संघ, सोलापूर यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

सोलापूर (बारामती झटका)
दि. 21 एप्रिल 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त, मूलनिवासी सभ्यता संघ, सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दि. 18 मे 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मिलिंद नगर, सोलापूर या ठिकाणी उत्साहात पार पडला.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे –
१) प्रथम क्रमांक – जान्हवी चंदनशिवे (सोलापूर)
२) द्वितीय क्रमांक – प्रगती गेंड (माळशिरस)
३) तृतीय क्रमांक – आरती कांबळे (सोलापूर)

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मुलनिवासी सभ्यता संघ राज्य उपाध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक मारुती बेलभंडारे सर होते. तर महाराष्ट्र राज्य मुलनिवासी सभ्यता संघ कार्यकारिणी सदस्य सुशांत निकंबे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्मिता अबुटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी स्पर्धक, मान्यवर पाहुणे, संयोजक आणि उपस्थित सर्वांचे मूलनिवासी सभ्यता संघ, सोलापूर तर्फे आभार मानण्यात आले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



