ताज्या बातम्यासामाजिक

ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, ना. ॲड. आशिष शेलार, ना. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सुमन सिनेप्लेक्स टेंभुर्णी थाटात व दिमाखात उद्घाटन संपन्न होणार….


माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व. शामराव भीमराव पाटील यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर….

टेंभुर्णी (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते तर माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ना. ॲड. आशिष शेलार व ग्रामविकास व पंचायत राज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, माढा तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. 21 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 05 वा. सुमन सिनेप्लेक्स टेंभुर्णी ता. माढा, येथे थाटात व दिमाखात उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.

माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय माजी आमदार शामराव भीमराव पाटील उर्फ भाऊ यांनी स्वर्गीय विजयराव शामराव पाटील उर्फ आबा यांच्या संकल्पनेतून श्रीराम सिनेमा अकलूज येथे सुरू केलेला होता. टेंभुर्णीच्या नागरिकांनाही सिनेमाचा आस्वाद घेता यावा, म्हणून 1985 साली एका तंबूमध्ये सिनेमा सुरू केलेला होता. नंतर त्याच ठिकाणी जानकी सिनेमा इमारत स्वरूपात थेटर उभा केलेले होते. भाऊंनी व आबांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले.

काळानुसार बदल करीत तीच परंपरा पुढे सुरू ठेवत सुमन सिनेप्लेक्स हे दोन स्क्रीनचे आधुनिक सिनेमागृह (एअर कंडिशन्ड, डॉल्बी ॲटोमाॅस 2 के व 3 डी प्रोजेक्शन) टेंभुर्णी व परिसरातील सिनेरसिकांच्या मनोरंजनासाठी सुरू करीत आहोत. या सिनेमागृहाच्या उद्घाटन समारंभास आपण उपस्थित रहावे, असे श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश शामराव पाटील व माळशिरस पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. श्रीलेखा प्रकाश पाटील व समस्त पाटील परिवार पानीव यांच्यावतीने मित्रपरिवार, नातेवाईक व सिनेरसीक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button