ताज्या बातम्यासामाजिक

ना स्वार्थासाठी ना मतासाठी फक्त जनतेच्या हितासाठी, स्तुत्य उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिक व भाविकभक्तांमधून कौतुक…


मांडवे (बारामती झटका)

समाजामध्ये अनेक लोक स्वतःच्या स्वार्थासाठी, मतासाठी सामाजिक उपक्रम राबवितात. मात्र, मांडवे ता. माळशिरस, या गावांमध्ये माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बबनबापू पालवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवे ग्रामपंचायतींचे कर्तव्यदक्ष विद्यमान सदस्य उद्योजक रितेशभैया पालवे पाटील यांनी ना स्वार्थासाठी, ना मतासाठी फक्त जनतेच्या हितासाठी बसण्याची बाकडे बसविण्याचा स्तुत्य उपक्रम केला आहे. ज्येष्ठ नागरिक व भाविकभक्तांमधून याचे कौतुक केले जात आहे.

समाजामध्ये अनेक लोक राजकीय हेतू मनामध्ये ठेवून सामाजिक कार्य करीत असतात. काही नेतेमंडळी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अथवा निवडणूक काळात समाज उपयोगी कार्यक्रम राबवितात. मात्र, मांडवे गावामध्ये पालवे पाटील परिवारातील पिता-पुत्र यांनी जनतेच्या हितासाठी मांडवे गावात मंदिराच्या शेजारी बाकडे बसविण्याचा स्तुत्य उपक्रम केलेला आहे.

मांडवे गावामध्ये ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या सभा मंडपाच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला दोन बाकडे व अन्य मंदिराच्या ठिकाणी बाकडे बसवलेली आहेत. दररोज हनुमानाचे दर्शन घेण्याकरता मांडवे पंचक्रोशीतील हनुमान भक्त येत असतात. अशावेळी विसावा म्हणून बाकड्याचा आधार होणार आहे. विशेष म्हणजे वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांना या स्तुत्य उपक्रमाचा फायदा होणार आहे. सध्या राजकीय निवडणुका नाहीत तरीसुद्धा पिता पुत्र यांच्या स्तुत्य उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिक व भाविकभक्तांमधून कौतुक केले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

3 Comments

  1. [url=http://sale-cloned-cards.cvv2cvc.com]http://sale-cloned-cards.cvv2cvc.com[/url]

    Item 1 Card Total Balance: $3100 – Price $ 110.00
    Item 3 Cards Total Balance $9600 – Price $ 180.00
    Item PayPal Transfers $500 – Price $ 49.00
    Item PayPal Transfers $2000 – Price $ 149.00
    Item Western Union Transfers $1000 – Price $ 99.00
    Item Western Union Transfers $ 300 – Price $ 249.00

    *Prices on the website may vary slightly

    [url=http://sale-cloned-cards.cvv2cvc.com]http://sale-cloned-cards.cvv2cvc.com[/url]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button