नगररचनाकार ५ लाखाची लाच घेताना अँटीकरप्शनच्या जाळ्यात, पाच दिवस सापळा लावला होता…

तत्कालीन मुख्याधिकारी रचनाकार, कनिष्ठ लिपिक बांधकाम, खाजगी इसम चार जणांवर गुन्हा दाखल..
सातारा (बारामती झटका)
सातारा येथे नगररचनाकारासह आणखी चार जणांना पाच लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. एकूण १० लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील ५ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून लाचखोरांना पकडले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे कराड शहरातील सि. सर्व्हे क्रं ७९ सोमवार पेठ कराड येथे पार्किंग आणि पाच मजली इमारतीचे काम प्रास्तावीक आहे. तक्रारदार यांचेकडून इमारत बांधकाम परवानगी मिळणेबाबत २०१७ मध्ये नगरपरिषद कराड येथे प्रकरण देण्यात आले होते. त्या कामाची मुदतवाढ दि. ०२/०१/२०१९ पर्यंत घेण्यात आली होती.
सदरचे काम सुरू न झाल्याने पुन्हा २०२१ मध्ये सुधारीत परवानगी मिळाली परंतू, दरम्यानच्या काळात नियमावलीत बदल झाल्याने सुधारीत बांधकाम परवानगी परवाना मिळणेबाबत पुन्हा २०२३ मध्ये अर्ज दाखल केला होता. सदरील परवानगी करीता तक्रारदार यांनी सहाय्यक नगररचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी खाजगी इसम अजिंक्य देव यांच्या समावेत तक्रारदार यांना समक्ष भेटून त्यांचे कामात २००० स्केअर फुट वाढीव एफएसआय इतकी मिळकत असल्याने बाजारभावाप्रमाणे मिळकत किंमत अदांज ८० लाखापैकी दहा ते बारा टक्के रक्कम म्हणजे १०,००,०००/- रूपयाची लाच रक्कम पंचासमक्ष मागणी केली.
सदर लाच मागणी रक्कमेपैकी पहिला हप्ता म्हणून रूपये ५,००,०००/- लाच रक्कम खाजगी इसम यांचे सांगणेवरून आरोपी लोकसेवक तौफीक शेख यांनी स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. आरोपी लोकसेवक शंकर खंदारे हे नगरपरिषद कराड येथे मुख्याधिकारी गट अ नगरपरिषद कराड या पदावर कार्यरत होते. ते दि. २०/०३/२०२५ रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद कराड या पदावरून कार्यमुक्त झाले आहेत. तरी देखील त्यांनी तक्रारदार यांची सुधारीत बांधकाम परवाना परवानगी बाबतचे खाजगी इसम अजिंक्य देव यांचेकडून प्राप्त झाले फाईलवरून आरोपी २ व ३ यांच्या मदतीने बांधकाम परवाना करीता आवश्यक असले चलन आलोसे क्र. २ यांचे व्हॉट्सॲप वरून स्वतःचे मोबाईल क्रमांकावर घेवून मागील तारखेच्या चलनावर आज रोजीसह्या करून आरोपी लोकसेवक २ यांच्या मोबाईल क्रमांकावरती परत पाठवून लाच घेण्यास पोषक वातावरण तयार करून सदर लाच मागणी प्रकरणास प्रोत्साहन दिले आहे. तसेच आरोपी क्र. २ यांनी आरोपी क्र. ४ खाजगी इसम यांचे मार्फतीने तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करून प्रोत्साहन दिले. तसेच आरोपी क्र. ३ यांनी आरोपी क्र. २ यांचे सांगण्यावरून मुख्याधिकारी हे कार्यमुक्त झाल्यानंतर देखील त्यांच्या नावाचे स्वाक्षरी करीता चलन तयार करून ते पाठीमागील तारखेस जावक करून खाजगी इसमाचे सांगणेवरून लाच रक्कम स्विकारली आहे. आरोपी क्र. ४ यांनी आरोपी क्र. १ व २ यांचे करीता लाच मागणी करून आरोपी क्र. २ याचे सांगणे वरून तक्रारदार यांना वेळोवेळी लाच मागणी करून प्रोत्साहन दिले आहे. सबब सदर आरोपीतांनी यातील तक्रारदार यांना त्यांचे प्रलंबीत कामाकरीता आपले पदाचा गैरवापर करीत, लाच मागणी करून, प्रोत्साहन देवून अपप्रेरणा दिलेचे निष्पन्न होत आहे.
सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस हवालदार नितीन गोगावले, पोलीस हवालदार गणेश ताटे, पोलीस हवालदार निलेश राजपुरे, पोलीस हवालदार प्रशांत नलावडे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रमसिंह कणसे या सापळा पथकाने सापळा रचून लाचखोरांना रंगेहात पकडले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.